मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /मंजिरीसोबत रोमँटिक डान्स करताना प्रसादने मध्येच काढला पळ, कारण आहे खूपच भन्नाट

मंजिरीसोबत रोमँटिक डान्स करताना प्रसादने मध्येच काढला पळ, कारण आहे खूपच भन्नाट

प्रसाद ओक आणि मंजिरी ओक

प्रसाद ओक आणि मंजिरी ओक

नुकातच प्रसाद ओकनं बायको मंजिरी ओकसोबत एक व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केला पण व्हिडिओ मध्येच सोडून तो निघून गेला. त्यानं असं करण्यामागं काय कारण आहे, असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 1 एप्रिल- अभिनेता प्रसाद ओक सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. तो त्याचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. याशिवाय बायको मंजिरी ओकसोबत देखील तो भन्नाट व्हिडिओ शेअर करत असतो. नुकातच त्याने बायको मंजिरी ओकसोबत एक व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केला पण व्हिडिओ मध्येच सोडून तो निघून गेला. त्यानं असं करण्यामागं काय कारण आहे, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. सध्या या दोघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

मंजिरी ओकनं इन्स्टावर एक रील शेअर केलं आहे. प्रसाद आणि त्याची बायको मंजिरी ओक एकमेकांचा हात हातात घेत टीप टीप बरसा पाणी गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. डान्स सुरू असताना अचानक गाण्यातून एका बाईच्या ओरडण्याचा आवाज ऐकू येतो. हा आवाज एकदम विचित्र आहे, हे ऐकताच प्रसाद मंजिरीकडे घाबरत बघून डान्स करता करता पळायला लागतो. मंजिरी त्याला मागून थांबवत असते.

वाचा-ना भांडण ना मतभेद; वाढदिवसादिवशी कुटुंबापासून दूर आहे अभिनेत्री, कारण चिंताजनक

या नवरा बायकोचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोघांच्या या व्हिडिओला मराठी कलाकारांनी लाईक्स आणि कमेंट्स कमेंट्सचा वर्षाव केला आहे.मंजिरी ओकनं हा व्हि़डिओ शेअर करत म्हटलं आहे की, प्रसाद... कराओके घेऊया का ???? मंजिरीच्या या कॅप्शनवरून सर्वांच्या कारण लक्षात आलेच आहे.  आवाज हे मुळ कारण असल्याने प्रसाद ओक डान्स सोडून पळून गेला.

View this post on Instagram

A post shared by Manjiri Oak (@manjiri_oak)

प्रसाद ओकनं धर्मवीर सिनेमात अनंत दिघे यांची भूमिका साकारली होती. या सिनेमातील प्रसाद ओकच्या अभिनयाचे सर्वांकडून कौतुक झालं. नुकताच या सिनेमातील भूमिकेसाठी प्रसाद ओकला यंदाचा मराठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. विशेष म्हणजे हा पुरस्कार त्याला त्याच्या अवडती अभिनेत्री अश्विनी भावे यांच्याकडून मिळाला.

प्रसाद ओकने आजपर्यंत दिग्दर्शन, निर्मिती, लेखन, गायन ह्या सर्व क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. त्यांने अनेक नाटकांमध्ये काम केले आहे. अनेक मालिकांमध्ये व अनेक चित्रपटांमध्ये अभिनेता म्हणून काम केले आहे.प्रसाद ओक दिग्दर्शित चंद्रमुखी सिनेमा चांगलाच गाजला. शिवाय त्याच्या धर्मवीर सिनेमानं सर्वांचे मन जिंकलं. त्याच्या अभिनयाचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील कौतुक केले होते.

First published:
top videos

    Tags: Entertainment, Marathi entertainment