Home /News /entertainment /

तापसी पन्नूच्या ‘थप्पड’चा ट्रेलर बघून तुम्ही काय शिकलात, एका महिलेने मात्र पतीला...

तापसी पन्नूच्या ‘थप्पड’चा ट्रेलर बघून तुम्ही काय शिकलात, एका महिलेने मात्र पतीला...

महिलांना त्यांच्या अस्त्वित्वाची जाणीव करुन देणाऱ्या या चित्रपटातून प्रेरणा घेणाऱ्या या महिलेचा व्हिडिओ व्हाय़रल झाला आहे

    नवी दिल्ली, 2 फेब्रुवारी : काही दिवसांपूर्वी अभिनेत्री तापसी पन्नूचा ‘थप्पड़’ (Thappad) चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर सध्या समाज माध्यमांवर चांगलाच गाजतो आहे. महिलांना त्यांच्या अस्त्वित्वाची जाणीव करुन देणारा हा चित्रपट महिलांवरील घरगुती हिंसाचाराविरोधात आवाज उठवणारा आहे. मात्र हा ट्रेलर बघून आणखी एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. अनेकदा महिला घरात होणाऱ्या हिंसाचाराकडे दुर्लक्ष करतात. एक स्त्री म्हणून आपण पतीच्या हिंसाचाराकडे दुर्लक्ष करीत असल्याचे संस्कार त्यांच्याकड़े करण्यात आलेले असतात. मात्र कोणताही मारहाण स्वीकाहार्य नाही. मात्र आपल्याकडे अद्यापही महिलांना दुय्यम वागणूक दिली जाते. ती करिअर करीत असतानाही तिनं घराकडे दुर्लक्ष केलेलं चालत नाही. अशा परिस्थितीत थप्पड या चित्रपटाचा विषय आपल्य़ा समाजातील महिलांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीविरोधात चांगलाच थप्पड लगावणारा आहे. नव्याने प्रसिद्ध झालेल्या एका व्हिडिओमध्ये एक महिला आपला अनुभव व्यक्त करीत आहे. जर माझा पती माझी मारहाण करेल तर मी ही त्याला मारेन आणि नंतर पोलिसांकडे घेऊन जाईन, असे तिने या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. या महिलेने यापूर्वीही आपल्या पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे. सातत्याने घरेलू हिंसाचार सहन करुनदेखील ही महिला आपल्या पतीजवळ पुन्हा जाते. मात्र चित्रपट थप्प़डचा (Thappad) ट्रेलर पाहून एकदा पुन्हा या महिलेत अधिकारांबाबत जागरुकता निर्माण झाली आहे. अभिनेत्री तापसी पन्नूनेदेखील हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहुन अत्यंत वाईट वाटल्याचे तिने लिहिले आहे. आपल्यातील अनेक महिला हिंसाचार सहन करतात. माझा विश्वास आहे की चित्रपट पाहिल्यावर तुम्ही गप्प बसणार नाही आणि आपल्या अधिकारांसाठी घराबाहेर पडाल, असं तापसीने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या