मुंबई, 6 सप्टेंबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचं रहस्य अद्याप उलगडलेलं नाही. त्याच्या मृत्यूमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. मात्र सर्वाधिक धक्का त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेला बसला होता. टीव्हीवरील पवित्र रिश्ता या मालिकेपासून त्यांच्या दोघांच्या प्रेमाचं सूत जुळलं. त्यानंतरही अनेक वर्षे ते दोघं प्रेमात होते. मात्र काही कारणानं त्यांच्या दुरावा आला..त्यांची जोडी प्रेक्षकांनाही आवडत होती. त्यात सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांसह अंकिताही सीबीआय तपासाची मागणी करीत होती.
अंकिता लोखंडे सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. ती सोशल मीडियावर कुटुंबीय व मित्र-मैत्रिणींसोबतचे फोटो शेअर करते. आताच अंकिताने आपल्या आईसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. अंकिताने आईसोबत एक छानसा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करताना तिने लिहिले आहे की - मी सर्वप्रथम आणि नेहमीच फेव्हरेट टीचर..तुला शिक्षक दिनाच्या शुभेच्छा आई...मी माझ्या मुलांसाठीही तुझ्यासारखं होऊ इच्छिते..लव्ह यू आई..
अंकिताने टीचर्स डेच्या निमित्ताने आईसाठी ही खास पोस्ट केली आहे. अंकिताची ही पोस्ट फॅन्सना खूप आवडली आहे.
View this post on Instagram#SushantSinghRajput #AnkitaLokhande #PavitraRishta #TrueLove
काही दिवसांपासून अंकिताचा एक ऑडिओ व्हायरल झाला आहे. अंकिता आणि सुशांतच्या फोटोसह अंकिताचा ऑडिओ ऐकू येत आहे. यामध्ये तिला विचारलं जात आहे की अंकिता सुशांतला शेवटी काय संदेश देऊ इच्छिते? अंकिता म्हणते, मी बस्स इतकंच सांगू इच्छिते, सुशांतला प्रेम करण्यासाठी खूप जणं आहेत..तुझ्यासाठी संपूर्ण देश उभा राहिला आहे..