मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

VIDEO : साराच्या होणाऱ्या नवऱ्याबाबत करण हे खुलेआम काय बोलून गेला? अभिनेत्रीलाही वाटली लाज

VIDEO : साराच्या होणाऱ्या नवऱ्याबाबत करण हे खुलेआम काय बोलून गेला? अभिनेत्रीलाही वाटली लाज

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ही त्या बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे जिने फार कमी वेळात चाहत्यांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे.  अभिनेत्री सारा अली खान नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sayali Zarad

मुंबई, 20 सप्टेंबर : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ही त्या बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे जिने फार कमी वेळात चाहत्यांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे.  अभिनेत्री सारा अली खान नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अशातच साराचा नवा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ती फिल्ममेकर करण जोहरसोबत दिसत आहे.

विरल भयानीने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये सारा अली खान आणि करण जोहर मुंबई विमानतळावरून हातात हात घालून फिरताना दिसत आहेत. यादरम्यान दोघेही पापाराझींसोबत मजेशीर संवाद साधताना दिसतात. एअरपोर्टवर पॅप्स पाहून करण जोहर म्हणतो, तुम्ही साराची कविता ऐकली पाहिजे. यावर सारा म्हणते 'इन फ्रन्ट ऑफ करण जोहर साराज शायरी इज ओव्हर'. त्यानंतर करण म्हणतो, 'कोण बनेल साराचा नवरा'. हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

या व्हिडिओवर यूजर्स मजेशीर प्रतिक्रियाही देत ​​आहेत. एका मीडिया यूजरने लिहिले की, करण जोहर खूप मजेदार आहे. आणखी एका युजरने लिहिले, सारा क्यूटी आहे. सारा, शायरी आणि पती. दुसर्‍या यूजरने लिहिले, शुभमन गिल आहे का?, वाह, शुभमन आणि साराची जोडी छान दिसेल'.

हेही वाचा - Kartik Aaryan ला भेटण्यासाठी चिमुकल्या चाहत्याने केलं असं काही की....; पाहा VIDEO

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सारा अली खान आणि क्रिकेटर शुभमन गिल एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. दोघांनाही दुबईमध्ये डिनर करताना एकत्र स्पॉट केलं होतं. तेव्हापासून त्यांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलं आहे. शुभमनच्या पहिले साराचं नाव कार्तिक आर्यनसोबत जोडलं गेलं होतं.

First published:

Tags: Bollywood, Bollywood actress, Bollywood News, Karan Johar, Sara ali khan