VIDEO : परदेशी क्रिकेटपटूनं बॉलिवूड अभिनेत्रीला केलं प्रपोज, IPL सारखा असणार लग्नाचा थाट

VIDEO : परदेशी क्रिकेटपटूनं बॉलिवूड अभिनेत्रीला केलं प्रपोज, IPL सारखा असणार लग्नाचा थाट

सोशल मीडियावरच परदेशी खेळाडूनं केलं बॉलिवडू अभिनेत्रीला प्रपोज आणि...

  • Share this:

मुंबई, 12 डिसेंबर : बॉलिवूड आणि क्रिकेट यांचे नाते जुने आहे. अनेक अभिनेत्रींनी क्रिकेटपटूंशी विवाह केला आहे. एवढेच नाही तर परदेशी खेळाडूंसोबतही बॉलिवूड अभिनेत्रींचे नाव जोडले गेले आहे. मात्र एक परदेशी खेळाडूनं सोशल मीडियावरच बॉलिवूड अभिनेत्रीला प्रपोज केले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा परेदशी खेळाडू आहे वेस्ट इंडिजचा माजी खेळाडू ड्व्हेन ब्राव्हो.

वेस्ट इंडीजचा माजी क्रिकेटपटू ड्वेन ब्राव्हो आजकाल भारतात आहे. आपले नवीन हिंदी गाणे लाँच करण्यासाठी ब्राव्हो सध्या प्रमोशन करत आहे. दरम्यान, डीजे ब्राव्हो या नावाने प्रसिध्द असलेला ब्राव्हो त्याच्या खास शैलीतील गाण्यासाठी देखील ओळखले जाते. यावेळी ब्राव्हो एक नवीन गाणे घेऊन येत आहे ज्यात त्याच्याबरोबर शक्ती मोहन देखील दिसणार आहेत आणि त्याला छमिया सॉन्ग असे नाव आहे. या व्हिडिओमध्ये क्रिकेट चाहत्यांनाही ब्राव्हो या हिंदी गाण्यावर नाचताना पाहता येणार आहे.

या गाण्यामुळे ब्राव्हो आजकाल बरीच चर्चेत आहे, परंतु त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, त्यानंतर तो अधिक चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये ब्राव्हो भारतीय अभिनेत्रीला प्रपोज करताना दिसत आहे. या व्हिडीओला जेव्हा क्रिकेटपटू तुम्हाला प्रपोज करतो...असे शीर्षक दिले आहे.

 

View this post on Instagram

 

Hopefully @radhika_bangia accept me!! ❤️❤️ #Champion #2Easy

A post shared by Dwayne Bravo Aka Mr. Champion (@djbravo47) on

या व्हिडिओमध्ये ब्राव्हो हिंदीमध्ये राधिका बांगिया या अभिनेत्रीला, तु माझ्याशी लग्न करशील का?, असे विचारतो. यावर आश्चर्यचकित होऊन होकार हेते. त्यानंतर राधिका त्याला वेगवेगळे प्रश्न विचारते, पहिला प्रश्न तर आम्ही दोघे कुठे लग्न करणार असे विचारते. यावर ब्राव्हो क्रिकेट स्टेडियमच्या मध्यभागी, असे उत्तर देतो. याशिवाय ब्राव्हो आयपीएल चीअरलीडर्स त्यांच्या लग्नात नाचतील आणि त्यांचा विवाह सोहळा आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्याइतकाच मोठा असेल, असेही प्लॅन करतो. दरम्यान या व्हिडिओमध्ये, जेव्हा राधिकाने ब्राव्होला सांगितले की लग्नानंतर त्यांना दोन लहान मुले होतील, त्यावर दोन वर्ल्ड कप ट्रॉफीसारखी असे मजेशीर उत्तर ब्राव्हो देतो. मजेशीर संवाद असलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

राधिका बांगिया ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री असून तिने यारियां (2014), इरादा (2017) आणि वीकेंड्स (2018) सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तर ब्राव्होनं याच वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. डिसेंबर 2010 पासून त्याला एकदिवसीय सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. तर शेवटचा कसोटी सामना 2014मध्ये खेळला होता. तर, शेवटचा टी -20 सामना 2016मध्ये खेळला होता.

Published by: Priyanka Gawde
First published: December 12, 2019, 9:08 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading