Home /News /entertainment /

'नवीन वर्ष तुमच्याशिवाय पण तुमच्या....' इरफान खानच्या मुलाने दिल्या आगळ्यावेगळ्या शुभेच्छा

'नवीन वर्ष तुमच्याशिवाय पण तुमच्या....' इरफान खानच्या मुलाने दिल्या आगळ्यावेगळ्या शुभेच्छा

नववर्षाचं स्वागत करतानाच इरफान खानच्या (Irrfan Khan) मुलाने (Babil Khan) त्या दोघांचा एक खास फोटो शेअर केला आहे. त्याची ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे.

  मुंबई, 01 जानेवारी: 2020 हे वर्ष जगातील अनेक व्यक्तींसाठी वाईट गेलं. आधी कोरोना (Coronavirus) त्यामुळे सुरू झालेला लॉकडाऊन (Lockdown) त्यानंतर निर्माण झालेली बेरोजगारी. यामुळे सर्वांच्याच नाकी नऊ आले होते. बॉलिवूड इंडस्ट्रीलादेखील हे वर्ष तितकसं चांगलं गेलं नाही. यंदा बॉलिवूडमधील अनेक कलाकारांचं दुर्दैवी निधन झालं त्यामध्ये एका होता अभिनेता इरफान खान (Irrfan Khan). इरफान जरी गेला असला तरी त्याच्या मुलाच्या आणि पत्नीच्या मनात तो अजूनही घर करुन आहे. नवीन वर्षाचं स्वागत करत असतानाच इरफान खानचा मुलगा बाबिल खानने (Babil Khan) आपल्या वडिलांचा फोटो शेअर करत खास शुभेच्छा दिल्या आहेत. बाबिलने इरफान खानसोबतचे 2 फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, त्यातील तो वडिलांसोबत झोपला असल्याचं दिसून येत आहे. इरफान खान आणि बाबिलचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहेत. अनेक युजर्स कॉमेंट्सच्या माध्यमातून बाबिलला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहेत. यात बाबिलने कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, नवीन वर्ष तुमच्याशिवाय (इरफान खान) पण तुमच्या आशीर्वादाने. सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा.
  View this post on Instagram

  A post shared by Babil (@babil.i.k)

  इरफान खानच्या निधनानंतर बाबिल खान नेहमीच वडिलांसोबतचे फोटो त्यांच्या आठवणी सोशल मीडियावरुन शेअर करत असतो.
  View this post on Instagram

  A post shared by Babil (@babil.i.k)

  इरफान खानचा सॉन्ग ऑफ स्कॉर्पियन्स (The Song of Scorpions) हा सिनेमा 2021 मध्ये प्रदर्शित होणार आहे. सॉन्ग ऑफ स्कॉर्पियन्स या सिनेमात इरफान खानने एका व्यापाऱ्याची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात इरफानसोबत ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री वहीदा रहमान आणि अभिनेत्री गोलशिफ्तेह फरहानी (Golshifteh Farahani) झळकणार आहे. या चित्रपटाचा प्रीमियर 2017 मध्ये स्वित्झर्लंडमधील लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलमध्ये झाला होता.
  Published by:Amruta Abhyankar
  First published:

  पुढील बातम्या