मार्च 2020 मध्ये ‘समांतर’ ही रहस्यमयी वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. सतीश राजवाडे यांनी या वेबसिरीजचं दिग्दर्शन केल होतं. तर स्वप्नील जोशी, तेजस्विनी पंडित आणि नितीश भारद्वाज यांनी यात महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. ही वेबसिरीज प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडली होती. त्यामुळे त्याचा सीजन 2 सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.View this post on Instagram
सीजन 2 चं सध्या जोरात डबिंग सुरु आहे. स्वप्नीलने सुद्धा आपलं डबिंग सुरु केल आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये स्वप्नील स्टुडीओमध्ये काही डायलॉग म्हणत असताना दिसत आहे. ते याचवेळी स्टुडीओमधील एक कलाकार येऊन स्वप्नीलचा व्हिडीओ करू लागतो. पहिला तर स्वप्नील त्याला ओरडतो. मात्र नंतर स्वतःचं हसू लागतो. असा हा मजेशीर व्हिडीओ आहे. यामध्ये स्वप्नीलने स्वतः माहिती दिली आहे. की तो समांतर 2 चं डबिंग करत आहे. (हे वाचा:सामान्य मुलगी कशी झाली बिग बॉसची विजेती? पाहा मेघा धाडेचा अविश्वसनीय प्रवास ) समांतरचा पहिला सीजन खुपचं लोकप्रिय ठरला होता. यामध्ये फक्त 9 एपिसोड होते मात्र त्यातचं प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली होती. त्यामुळे पुन्हा एकदा ‘समांतर 2’ आपली उत्कंठा वाढवायला येत आहे. बरेच दिवसां पासून चाहते याची आतुरतेने वाट पाहात आहेत. मात्र सध्या स्वप्नीलच्या डबिंगचा व्हिडीओ पाहून ही प्रतीक्षा लवकरच संपणार असल्याचं कळतं, त्यामुळे चाहते जाम खुश आहेत.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Swapnil joshi, Web series