Home /News /entertainment /

'आई होण्याचा विचार नाही', घटस्फोटानंतर बदलले अभिनेत्रीचे विचार

'आई होण्याचा विचार नाही', घटस्फोटानंतर बदलले अभिनेत्रीचे विचार

कीर्तीनं सेल्फ लव्ह संकल्पनेबाबतही आपले विचार मांडले. ती म्हणाली, सध्या मी सिंगल आहे. म्हणजे टेक्निकली प्रेमात पडण्यासाठी मी पूर्णपणे ओपन आहे. पण, मला खरंच त्याची गरज आहे का? असा जेव्हा मी विचार करते तेव्हा 'नाही' असं उत्तर मिळतं.

पुढे वाचा ...
मुंबई, 25 जानेवारी: नुकतीच हॉटस्टारवर 'ह्युमन' (Human on Disney plus Hotstar) ही वेबसीरिज रिलीज झाली आहे. ड्रग ट्रायल्सच्या विषयाभोवती फिरणारी ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. या सीरिजमध्ये शेफाली शाह (Shefali Shah) आणि कीर्ती कुल्हारी (Kirti Kulhari Latest Web series) यांनी आपल्या दमदार अभिनयानं लोकांची मनं जिंकली. दोघींमध्ये एक किसिंग सीनही दाखवण्यात आला आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून दोघीही चर्चेत आहेत. या दोघींपैकी, कीर्ती कुल्हारी (Kirti Kulhari) सध्या जास्त चर्चेत आहे. अभिनेत्री कीर्ती कुल्हारीनं अलीकडच्या काळात अनेक प्रोजेक्ट्समध्ये अभिनय केला आहे. कीर्ती अनेक चित्रपटांमध्ये दिसली पण, तिला फारसा स्क्रीन टाईम मिळाला नाही. मात्र, या गोष्टीचा तिच्या कामगिरीवर कोणताही फरक पडला नाही. आपल्या अभिनय कौशल्याच्या बळावर तिनं प्रेक्षकांमध्ये ओळख आणि स्थान निर्माण केलं आहे. ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर कीर्तीची अभिनय कारकीर्द कमालीची यशस्वी ठरली आहे. कामाबरोबरच कीर्ती आपल्या वैयक्तीक आयुष्यामुळे देखील चर्चेत आहे. कीर्तीनं गेल्यावर्षी (2021) एप्रिल महिन्यात आपल्या पतीपासून घटस्फोट (Kirti Kulhari Divorce) घेतला आहे. तेव्हापासून तिच्या पर्सनल लाईफमध्ये गोंधळ सुरू आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कीर्तीनं लग्न केल्यानंतर आणि पती साहिल सेहगलपासून वेगळं झाल्यानंतर आयुष्यात झालेल्या बदलांविषयी मोकळेपणाने सांगितलं आहे. हे वाचा-रिक्षा चालवताना दिसला 'जीव माझा गुंतला'तील मल्हार; का ओढावली ही वेळ? कीर्ती कुल्हारीनं टाइम्स ऑफ इंडियाला एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीदरम्यान तिनं आपल्या पर्सनल लाईफविषयी अनेक गोष्टी उघड केल्या. 'साहिलसोबतच्या पाच वर्षांच्या नात्यामध्ये मला खूप चांगला अनुभव आला. मी एक चांगली व्यक्ती बनले आहे. एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय खूप मोठा होता.आमच्या जवळच्या अनेक लोकांवरही याचा परिणाम झाला. पण, घटस्फोटाचा निर्णय घेतल्यानंतर मी आणखी खंबीर झाले आहे. यापूर्वी मी स्वत:ला इतकं ठामपणे निर्णय घेतल्याचं पाहिलं नव्हतं', असं कीर्ती म्हणाली. हे वाचा-15 वर्षांपूर्वी ऐश्वर्या रॉयने आपल्या लग्नात नेसली होती इतकी महागडी साडी 'साहिलपासून वेगळं झाल्यानंतर माझ्या स्वत:च्या आयुष्यात अनेक बदल झाले. या गोष्टीनं मला स्वतःमध्ये आत्मविश्वास (Confidence) निर्माण करायला शिकवलं. आयुष्यात स्वत:साठी उभं राहण्यासोबतच अनेक महत्त्वाचे निर्णय घ्यायला शिकवलं. यामुळे लग्न मोडल्यानंतर मी आणखी सूज्ञ झाले आहे. आता माझी लग्नाबद्दलची विचारसरणीसुद्धा बदलली आहे. मी आता इतरांना लग्नाबाबत (Marriage) जो सल्ला देते तो चार वर्षांपूर्वीच्या सल्ल्यापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. मला असं वाटतं की सध्या मी माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम फेजमध्ये आहे आणि माझं व्यक्तीमत्वदेखील अतिशय चांगल्या पद्धतीनं तयार झालं आहे', असंही कीर्ती म्हणाली. कीर्तीनं सांगितल्याप्रमाणं ती सध्या एकदम हॅप्पी स्पेसमध्ये आहे. तिला लहान मुलांसाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे. यापूर्वी ती आई होण्याचा आणि स्वतःचं मूल होऊ देण्याचा विचार करत असे. मात्र, आता तिचा तो समज बदलला आहे. सध्या ती स्वतःला अविवाहित समजते आणि आई होण्याचा विचार तिच्या मनाला स्पर्शही करत नाही. तिनं स्वतःसाठी काही प्लॅन्स तयार केले आहेत.
कीर्तीनं सेल्फ लव्ह (Self Love) संकल्पनेबाबतही आपले विचार मांडले. ती म्हणाली, सध्या मी सिंगल आहे. म्हणजे टेक्निकली प्रेमात पडण्यासाठी मी पूर्णपणे ओपन आहे. पण, मला खरंच त्याची गरज आहे का? असा जेव्हा मी विचार करते तेव्हा 'नाही' असं उत्तर मिळतं. सध्या मला इतर कोणाचीही गरज नाही. कारण मी स्वतःवर प्रेम करायला शिकले आहे. कदाचित घटस्फोटाच्या निर्णयामुळे मला याची जाणीव झाली आहे. मी आत्ता ज्याप्रमाणं स्वत:शी कनेक्ट झाले आहे तशी पूर्वी कधीही झाले नव्हते'. एकूणच कीर्तीनं घटस्फोटानंतर आपल्या आयुष्याकडे पॉझिटिव्हली पाहिलं आहे. तिनं आपल्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींचा प्रोफेशनल लाईफवर परिणाम होऊ दिला नाही, असं दिसतं. कीर्ती आणि साहिल सेहगल (Sahil Sehgal) यांनी 2016 मध्ये लग्न केलं होतं. पाच वर्ष संसार केल्यानंतर दोघांनी 2021मध्ये वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता.
First published:

Tags: Bollywood, Bollywood actress

पुढील बातम्या