VIDEO : एकता कपूर घेऊन येतेय सर्वात बोल्ड वेब सीरिज, ट्रेलर लाँच

हल्ली वेब सीरिजचा प्रेक्षकवर्ग वाढलाय. घरबसल्या मनोरंजनाचा चांगला डोस मिळतो. एकता कपूरही एक बोल्ड वेबसीरिज घेऊन येतेय. तिचं नाव आहे ' XXX'

News18 Lokmat | Updated On: Sep 22, 2018 09:41 AM IST

VIDEO : एकता कपूर घेऊन येतेय सर्वात बोल्ड वेब सीरिज, ट्रेलर लाँच

मुंबई, 21 सप्टेंबर : हल्ली वेब सीरिजचा प्रेक्षकवर्ग वाढलाय. घरबसल्या मनोरंजनाचा चांगला डोस मिळतो. एकता कपूरही एक बोल्ड वेबसीरिज घेऊन येतेय. तिचं नाव आहे ' XXX' , ट्रिपस एक्स. यात सेक्स, महिला आणि काँट्रोव्हर्सी हे विषय हाताळलेत. याचा ट्रेलर बाहेर आलाय.

या सीरिजमध्ये  शांतनु महेश्वरी, अंकित गेरा, रित्विक धंजानी यांची मुख्य भूमिका आहे. बोल्डनेसची सगळी जबाबदारी पेललीय  कायरा दत्त आणि मेहरीन माजदा यांनी.

या ट्रिपल एक्समध्ये एकूण 5 कथा आहेत. रागिनी एमएमएस रिटर्न्स, लस्ट स्टोरीज, गंदी बात, सेक्रेड गेम्स यासारख्या बोल्ड सीरिज आतापर्यंत लोकप्रिय झाल्यात. या सीरिजचं ट्रेलरही बोल्ड आहे.

Loading...

एकता कपूरची 'कसौटी जिंदगी की 2' पुन्हा एकदा 10 वर्षांनी छोट्या पडद्यावर येतोय. त्याची तयारीही जोरदार सुरू आहे. या नव्या रूपातल्या मालिकेत नवे चेहरे पाहायला मिळणार आहेत. छोट्या पडद्यावर कसौटी जिंदगी की भरपूर गाजली होती. एकता कपूर त्याचा सीक्वल बनवतेय. आणि प्रेरणाची भूमिका एरिका फर्नांडिस करतेय. पण प्रश्न होता तो अनुरागच्या भूमिकेत कोण? तर तेही आता समजलंय. पार्थ समथान ही भूमिका करतोय. पण तुम्हाला माहीत आहे का, यात शाहरूख खानही आहे.

एकता कपूर आणि शाहरूख खाननं मिळून या मालिकेचा प्रोमो शूट केलाय. आणि त्यासाठी किती पैसे घेतलेत ठाऊकेय? तब्बल 8 कोटी रुपये. त्यात किंग खाननं एकता कपूरसोबतच्या प्रोमोला 5 कोटी घेतले, तर नंतर तीन प्रोमो केले त्याला 1,1 कोटी घेतलेत.

शाहरूख खान या मालिकेसाठी आपला आवाजही देणार आहे. सुरुवातीला एकूणच या मालिकेचा इतिहास शाहरूखच्या आवाजात ऐकायला मिळणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 22, 2018 09:41 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...