Bigg Boss 14 मध्ये कहर! राखी सावंतनं केली गार्डनमध्येच अंघोळ; राहुलने लावून दिला शँपू

Bigg Boss 14 मध्ये कहर! राखी सावंतनं केली गार्डनमध्येच अंघोळ; राहुलने लावून दिला शँपू

Bigg boss मधले काँटेस्टंट काय करतील याचा नेम नाही. राखी सावंतने (Rakhi Sawant) काय कहर केलाय पाहा.

  • Share this:

मुंबई, 28 जानेवारी : बिग बॉस सीझन 14 (Bigg Boss 14) मध्ये राखी सावंत (Rakhi Sawant) प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी कोणतीही कसर सोडताना दिसत नाही. प्रत्येक एपिसोडमध्ये राखी सावंत प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसून येत आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका एपिसोडमध्ये राखीनं पॅण्टमध्येच लघवी केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा आणखी एका कारनाम्यानं ती चर्चेत आली आहे.

बिग बॉसनं (Bigg Boss) घरातील बाथरूम एरिया जप्त केला आहे. यामुळे घरातील सदस्यांना हा भाग वापरता येत नसल्याने त्यांची अंघोळ करण्याची अडचण झाली आहे. यामुळे राखी सावंतनं अंघोळ करण्यासाठी गार्डनमध्ये ठाण मांडले; परंतु ती इतकेच करून थांबली नाही, तर तिच्या या कृत्यात राहुल वैद्य (Rahul Vaidya ) आणि अली गोनी (Ali Goni) यांनाही तिनं सहभागी करून घेतलं. या दोघांनीही राखीला अंघोळ(Rakhi Sawant Shampoo Bath) करण्यास मदत केली.

OMG! 5 वर्षांच्या चिमुरड्यानं चालवली Landcruiser; VIDEO पाहून थक्क व्हाल

राहुल वैद्य यानं अगदी ‘ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए’ हे गाणे गात राखीला शाम्पू लावून दिला. त्यावर राखी सावंतनं, मी कधीही अशी अंघोळ केली नसल्याचे म्हटलं. यावर राहुल वैद्य याने आज आमचे नशीब उघडले असे म्हटले. यानंतर राखीने अली गोनी (Ali Goni) याला केसाला कंडिशनर लावून देण्यास सांगितलं. अलीनं तत्परतेनं तिच्या केसांना कंडिशनर लावून दिला. अगदी सांग्रसंगीत अशी ही अंघोळ पार पडली. राखी सावंतच्या या बिनधास्त अंघोळीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून, बिग बॉसच्या या प्रोमोला चांगलीच पसंती मिळत आहे.

पोलिसांना सांगावं लागणार, 'कधी, कुणासोबत सेक्स करणार'; तरुणासाठी अजब नियम

बिग बॉसच्या घरात आल्यापासून राखी सावंत सतत काहीनाकाही कारणाने चर्चेत राहत आहे. अभिनव शुक्ला(Abhinav Shukla) याच्याबरोबरही तिने रोमँटिक पद्धतीने आपला खेळ रंगवण्याचा प्रयत्न केला होता. याचबरोबर टास्कमधील ज्युली हे कॅरेक्टर मध्येमध्ये आणून ती प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत असते. आता तिची अंघोळ हा सगळ्यांच्या कुतूहलाचा विषय ठरला असून, या व्हिडिओमुळे प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली आहे. आता बिग बॉसचा हा एपिसोड प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षक यावर कशी प्रतिक्रिया देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

First published: January 28, 2021, 9:40 PM IST

ताज्या बातम्या