वरुण धवननं WWE रेसलरला शिकवला बॉलिवूड डान्स, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

वरुण धवननं WWE रेसलरला शिकवला बॉलिवूड डान्स, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

भारतातच नाही तर परदेशातही बॉलिवूड सिनेमांचे चाहते आहेत. अमेरिका असो वा मग आणखी कोणता देश सगळीकडेच बॉलिवूडची क्रेझ कायम आहे.

  • Share this:

मुंबई, 18 नोव्हेंबर : भारतातच नाही तर परदेशातही बॉलिवूड सिनेमांचे चाहते आहेत. अमेरिका असो वा मग आणखी कोणता देश सगळीकडेच बॉलिवूडची क्रेझ कायम आहे. बॉलिवूड सिनेमा पाहण्यासोबतच बॉलिवूड डान्स शिकण्यासाठी अनेक परदेशी सेलिब्रेटी उत्सुक असलेले दिसतात. अशीच एक बॉलिवूड चाहती वर्ल्‍ड रेसलिंग एण्टरटेनमेंट (WWE)मध्ये सुद्धा आहे. तिचं नाव आहे चॅरलोट फ्लेअर (Charlotte Flair). काही दिवसांपूर्वीच तिनं भारताला भेट दिली. त्यावेळचा एक व्हिडीओ तिनं सोशल मीडियावर शेअर केला ज्यात बॉलिवूड अभिनेता वरुण धवन चॅरलोटला डान्स शिकवताना दिसत आहे.

WWE ची महिला रेसलर चॅरलोट फ्लेअर काही दिवसांपूर्वी WWE आवडणाऱ्या तरुण-तरुणींसोबत बालदिन साजरा करण्यासाठी भारतात आली होती. दरम्यान तिला भेटण्यासाठी तिचा चाहत्यांनी खूप गर्दी केली होती. याचवेळी तिनं बॉलिवूड स्टार अभिनेता वरुण धवनकडून बॉलिवूड डान्सच्या काही मूव्ह्ज सुद्धा शिकण्याचा प्रयत्न केला. याचाच एक व्हिडीओ तिनं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला.

'लाल सिंग चढ्ढा'चा First Look रिलीज, मजेदार अंदाजात दिसला आमिर खान

 

View this post on Instagram

 

HADIPPAAAAA!! Learning some popular Indian dance moves with @vjgaelyn from #WWENowIndia #india #bollywood #woo

A post shared by Charlotte Flair (@charlottewwe) on

याशिवाय भारत भेटीचा एक फोटो ट्विटरवर शेअर करताना तिनं लिहिलं, ‘मी भारताच्या प्रेमात पडले आहे. मला इथे आल्यावर एका कुटुंबाप्रमाणे वाटतं. या ठिकाणी साजरे केले जाणारे उत्सव आणि इथल्या लोकांची उदारता मला खूप भावते. माझी भारत भेट स्पेशल बनवल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. इथले पदार्थ, बॉलिवूड डान्स आणि साडी या सर्वच गोष्टी नेहमीच माझ्या स्मरणात राहतील.’

चॅरलोट फ्लेअर WEEचे लीजेंड स्टार रिक फ्लेअर यांची मुलगी आहे. रिक फ्लेअर यांनी WWEमध्ये 16 वेळा चॅम्पियनशिप जिंकत नवं रेकॉर्ड केलं होतं. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत त्यांची मुलगी चॅरलोटनंही WWE मध्ये प्रवेश केला आणि आता तिनं सुद्धा या ठिकणी नाव कमावलं आहे.

काजोल-अजय 12 वर्षींनी दिसणार एकत्र, ‘तानाजी’मधील तिचा First Look रिलीज

आदित्य रॉय कपूरला बर्थडे विश करण्यासाठी दीपिका-रणबीरनं घेतले पैसे? पाहा VIDEO

===========================================================

Published by: Megha Jethe
First published: November 18, 2019, 2:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading