Home /News /entertainment /

'मुंबई पोलीस पासपोर्टपे Religion देखके गोली नहीं चलाती', 'सूर्यवंशी'चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

'मुंबई पोलीस पासपोर्टपे Religion देखके गोली नहीं चलाती', 'सूर्यवंशी'चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

'मुंबई हिंदुस्तान का दिल...' या अजय देवगणच्या आवाजातील वाक्याने 'सूर्यवंशी'च्या ट्रेलरची सुरूवात होते. त्यानंतर चित्रपटाचा हिरो 'अक्षय कुमार'ची दमदार एंट्री होते.

    मुंबई, 2 मार्च : बॉलिवूडचा बहुप्रतीक्षित सिनेमा ‘सूर्यवंशी’ (Sooryavanshi) येत्या 24 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  या रोहित शेट्टीच्या या चित्रपटाच्या ट्रेलरबाबत सर्वांना कमालीची उत्सुकता होती. आज या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे आणि काही वेळातच ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. अक्षय कुमार फॅन्स अक्षरश: या ट्रेलरची वाट पाहत होते. कतरिना कैफ या चित्रपटात अक्षयसोबत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. अक्षय कुमार सोबतच अजय देवगण, रणवीर सिंह देखील या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. 'मुंबई हिंदुस्तान का दिल...' या अजय देवगणच्या आवाजातील वाक्याने 'सूर्यवंशी'च्या ट्रेलरची सुरूवात होते. त्यानंतर चित्रपटाचा हिरो 'अक्षय कुमार'ची दमदार एंट्री होते. 'मुंबई पोलीस पासपोर्टपे Religion देखके गोली नहीं चलाती', हा ‘खिलाडी’ कुमारचा डायलॉग नक्कीच येत्या काळात हिट ठरेल. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये तगडी स्टारकास्ट पाहायला मिळाली आहे. अक्षय कुमार, रणवीर सिंह, अजय देवगण, कतरिना कैफ त्याचप्रमाणे जॅकी श्रॉफ आणि जावेद जाफरीची झलक या चित्रपचटाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळाली. रणवीरच्या 'सिंबा'मधील तर अजयच्या 'सिंघम'मधील कॅरेक्टरची झलक या चित्रपटामध्ये देखील पाहायला मिळणार आहे हे या ट्रेलरवरून स्पष्ट होत आहे. या ट्रेलरमध्ये देखील अक्षय कुमारचा हेलिकॉप्टरमधील अंदाज आणि अजय देवगणची पोलीस गाडीमधून एंट्री पाहायला मिळाली. पूर्ण अॅक्शनने भरलेल्या ट्रेलरमध्ये रणवीरचा कॉमेडी अंदाज चेहऱ्यावर हसू आणतो. सिंघमची सिग्नेचर स्टेप सुद्धा ट्रेलरच्या शेवटी दिसली आहे. हा चित्रपट 24 तारखेला संध्याकाळी 6 वाजता प्रदर्शित होणार आहे. रोहित शेट्टीने दोन दिवसांपूर्वी अशी घोषणा केली होती की सोमवारी ट्रेलर लाँच होणार आहे. त्यानंतर ‘कॉप युनिव्हर्स’ चित्रपटांचे फॅन्स असणारे सर्वच प्रेक्षक या ट्रेलरच्या प्रतीक्षेत होती.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Akshay Kumar, Rohit Shetty

    पुढील बातम्या