'या' घटनेमुळे आत्महत्या करायची होती 'संजू' बाबाला !

'या' घटनेमुळे आत्महत्या करायची होती 'संजू' बाबाला !

राजकुमार हिरानी दिग्दर्शित आणि बहुप्रतीक्षीत 'संजू' हा सिनेमा अखेर आज प्रदर्शित होतो झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 29 जून : राजकुमार हिरानी दिग्दर्शित आणि बहुप्रतीक्षीत 'संजू' हा सिनेमा अखेर आज प्रदर्शित होतो झाला आहे. संजय दत्तचा बायोपिक असलेल्या या सिनेमात रणबीर कपूरने संजय दत्तची भूमिका साकारली आहे. पण या सिनेमातून संजय दत्तबद्दल एक खळबळजनक सत्य समोर आंल आहे. ते म्हणजे या एवढ्या मोठ्या प्रवासात संजय दत्तला आत्महत्या करण्याची इच्छा झाली होती.

ज्या वेळेस संजय दत्तला 5 वर्षांची शिक्षा होणार होती त्यावेळेस जेलमध्ये जाण्याऐवजी आत्महत्या केलेली बरी असा विचार संजय दत्तने केला होता. असं या बायपिकमध्ये दाखवण्यात आलं आहे.

VIDEO : कांदिवलीत नववीतल्या मुलीची आत्महत्या, आठव्या मजल्यावरून मारली उडी

त्यामुळे संजय दत्तचे चाहते आणि रणबीर कपूरचे चाहते असलेल्या सर्वांनाच या सिनेमाची उत्सुकता आहे. संजय दत्तचा बॉलिवूडमध्ये प्रवेश, त्यानंतर त्याचं ड्रग्जच्या आहारी जाणं, आणि मुख्य म्हणजे 1993 च्या बॉम्बस्फोट प्रकरणात आर्म्स अॅक्ट अंतर्गत त्याने भोगलेली शिक्षा या सगळ्याचा आलेख या सिनेमात पहायला मिळतोय.

राजकुमार हिरानी याचं दिग्दर्शन आणि विधू विनोद चोप्रा यांची निर्मिती असलेल्या संजू सिनेमाचं अॅडव्हान्स बुकिंग रविवारपासून सुरु झालं होतं. भारतभरात तब्बल चार हजार स्क्रिन्समध्ये हा सिनेमा प्रदर्शित झालाय.

घाटकोपर विमान अपघातात मृत्यू झालेल्या मारिया देशातल्या पहिल्या मुस्लिम महिला वैमानिक

या सिनेमात रणबीर कपूरसोबत मनीषा कोईराला, दिया मिर्झा, अनुष्का शर्मा, सोनम कपूर यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. संजू झालेल्या रणबीर कपूरचं नशीब यंदा उजळणार का, आणि बॉक्सऑफीसवर संजू किती कमावणार हे पाहणं इंटरेस्टिंग ठरेलं आहे.

हेही वाचा...

VIDEO : पुण्यातील पीव्हीआर मप्लिफ्लेक्समध्ये मनसेची कर्मचाऱ्याला मारहाण

सख्खा भाऊ झाला पक्का वैरी, मोठ्या भावानं संपवलं लहान भावाचं कुटुंब

First published: June 29, 2018, 1:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading