VIDEO : मन जिंकलं! ऋषी कपूर यांचा तेराव्याचा विधी करून परतलेल्या रणबीर, आलियानं केली फोटोग्राफरची चौकशी आणि...

VIDEO : मन जिंकलं! ऋषी कपूर यांचा तेराव्याचा विधी करून परतलेल्या रणबीर, आलियानं केली फोटोग्राफरची चौकशी आणि...

दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्या तेराव्याचा विधी मंगळवारी मुंबईतील घरी करण्यात आला. यावेळी कपूर कुटुंबाने एक प्रार्थना सभा (Rishi Kapoor Prayer Meet)आयोजित केली होती.

  • Share this:

मुंबई, 14 मे : बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांचे दीर्घ आजारानं 30 एप्रिल रोजी निधन झालं. दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्या तेराव्याचा विधी मंगळवारी मुंबईतील घरी करण्यात आला. यावेळी कपूर कुटुंबाने एक प्रार्थना सभा (Rishi Kapoor Prayer Meet)आयोजित केली होती. श्वेता बच्चन (Shweta Bachchan), रणधीर कपूर, त्यांची पत्नी बबिता कपूर, आदर्श जैन, करिश्मा कपूर(Karisma Kapoor), अरमान जैन आणि आलिया भट्ट यांच्यासह अनेक लोक ऋषी कपूर यांच्या प्रार्थना सभेला उपस्थित होते. या दरम्यान रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) एकत्र दिलसे. त्यांचा एक व्हिडीओही समोर आला आहे.

सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) आपल्या गाडीमध्ये बसलेले दिसत आहेत. यावेळी या दोघांना आपल्या कॅमेरात टिपण्यासाठी काही फोटोग्राफर रणबीर आणि आलिया यांच्या जवळ जातात. यावेळी, रणबीरनं काच खाली करून सर्व फोटोग्राफरची विचारपूस केली. रणबीरच्या शेजारी बसलेल्या आलियानं फोटोग्राफरला मास्क घालण्यास सांगितले. आलिया या व्हिडीओमध्ये फोटोग्राफरना सांगताना दिसत आहे की, 'तुम्ही मास्कशिवाय का फिरत आहात? काळजी घ्या.

वाचा-कॅन्सरमुळे बॉलिवूडला आणखी एक धक्का, 42 वर्षीय अभिनेत्याचं निधन

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

#RanbirKapoor with #aliaabhatt at #RishiKapoor tervah yesterday . . . #viralbhayani @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

वाचा-...आणि जखमी अवस्थेत अमिताभ बच्चन पोहोचले ऋषी कपूर यांच्या लग्नात!

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचा हा व्हिडिओ सेलिब्रेटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी आपल्या इन्साग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दोघं एकत्र दिसत आहेत. दरम्यान, गेल्या 2 वर्षांपासून ऋषी कपूर कॅन्सरविरुद्ध लढाई लढत होते. मात्र 30 एप्रिल रोजी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात ऋषी कपूर यांचे निधन झाले. लॉकडाऊनमुळे त्यांची दिल्ली येथे असलेली मुलगी रिद्धिमा कपूर साहनी वडिलांच्या अंत्यसंस्कारास उपस्थित राहू शकली नव्हती. मात्र त्यानंतर रिद्धिमा मुंबईत आपल्या आईला आधार देण्यासाठी आली आहे.

वाचा-ऋषी कपूर यांनी धडाक्यात लावलं होतं लेकीचं लग्न, असं पार पडलं कन्यादान

First published: May 14, 2020, 1:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading