सनी लिओनीनं तोडल्या BOLDNESS च्या सर्व मर्यादा, पाहा Ragini MMS Returns 2 Trailer

सनी लिओनीनं तोडल्या BOLDNESS च्या सर्व मर्यादा, पाहा Ragini MMS Returns 2 Trailer

सनी लिओनीची मुख्य भूमिका असलेला Ragini MMS Returns 2चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला.

  • Share this:

मुंबई, 13 डिसेंबर : बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिओनी बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा रागिनी सीरिजच्या माध्यामातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सनीची मुख्य भूमिका असलेला Ragini MMS Returns 2चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. या ट्रेलरमध्ये सस्पेन्स, अ‍ॅक्शन, थ्रिलर सोबतच हॉरर आणि बोल्डनेसचा जबरदस्त तडका पाहायला मिळत आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.

रागिनी MMS रिटर्न्स 2 ही वेब सीरिज येत्या 18 डिसेंबरला अल्ट बालाजी आणि ZEE5 वर रिलीज होणार आहे. सनी लिओनी दिव्या अग्रवाल आणि वरुण सूद यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या वेब सीरिजमध्ये या तिघांचाही खूपच बोल्ड आणि धमाकेदार लुक पाहायला मिळत आहे. याशिवाय या वेब सीरिजमध्ये सनी लिओनी ‘हॅलो जी’ गाण्यावर डान्स सुद्धा करताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच हे गाणं रिलीज झालं असून त्यालाही प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता.

रानू मंडलचं ‘तेरी मेरी...’ नाही तर ‘हे’ आहे Google वर सर्वाधिक सर्च केलेलं गाणं

ट्रेलरमध्ये रागिनी श्रॉफची झलक दाखवण्यात आली आहे. ही भूमिका दिव्या अग्रवाल साकारत आहे. ती वेब सीरिजमध्ये एका स्ट्रॉग मुलीची भूमिका साकारत आहे. ती तिची मैत्रिण वर्षासाठी एक बॅचलर पार्टी ठेवते. या पार्टीसाठी रागिनी तिच्या गर्ल्स गँग सोबत ट्रीपवर जाते. ज्या ठिकाणी त्याच्या आधीच एक बॉइज गँग पार्टीसाठी आलेली असते. हे सर्वजण एका हॉटेलमध्ये जातात आणि तिथूनच सिनेमाच्या कथेला सुरुवात येते. याच ठिकाणीपासून सीरिजमध्ये ट्विस्ट आणि टर्न्स यायला सुरू होतात. या वेबसीरिजमध्ये वरुण सूद हॉटेल मालकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

करिनाच्या शोमध्येच सासू शर्मिला टागोरनी समजावला मुलगी आणि सूनेमधील फरक

रानू मंडलचं ‘तेरी मेरी...’ नाही तर ‘हे’ आहे Google वर सर्वाधिक सर्च केलेलं गाणं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 13, 2019 04:17 PM IST

ताज्या बातम्या