या गाण्यावर शिकारा बोटीत बसून नृत्य करणं तिच्या बहिणीचं स्वप्न होतं असं तिने कॅप्शनमध्ये म्हणलं आहे. पूजा आणि तिच्या बहिणीचं रील बघून त्यांचं भन्नाट बॉन्डिंग दिसून येतंय. पूजा आणि तिच्या बहिणीचं घट्ट नातं आहे ते या रील मधून बघायला मिळतंय. हे ही वाचा- सलमान खान अजूनही अविवाहित का? साजिद नाडियाडवालाचा खुलासा! पूजाने काश्मीरमध्ये सुट्टी एन्जॉय करताना अनेक विडिओ आणि फोटो टाकले आहेत. काश्मिरी गुलाबांसोबत तिने सुंदर फोटो पोस्ट केला आहे. तिचा लेटेस्ट विडिओ सुद्धा चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. पांढरा शुभ्र कॉटनचा कुर्ता घालून शिकारा बोटीचा आणि शॉपिंगचा आनंद लुटणारी पूजा एकदम मनमोहक दिसत आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.