Home /News /entertainment /

निर्मिती सावंत थुकरटवाडीत! रिहर्सलचा Reel VIDEO पाहिला का? हसता हसता होईल पुरेवाट

निर्मिती सावंत थुकरटवाडीत! रिहर्सलचा Reel VIDEO पाहिला का? हसता हसता होईल पुरेवाट

सध्या सोशल मीडियावर कॉमेडी क्वीन निर्मिती सावंत (Nirmiti Sawant) यांचं एक Insta Reel प्रंचड व्हायरल होत आहे. 'चला हवा येऊ द्या' च्या (Chala Hawa Yeu Dya) सेटवरचा हा VIDEO आहे.

  मुंबई, 23 सप्टेंबर: सध्या सोशल मीडियावर खास करून इन्स्टावर रील  (Instagram Reels) वारे जोरात वाहत आहे. प्रत्येक जण दररोज कोणते ना कोणते रील करत असतात. यात मराठी कलाकार देखील मागे नाहीत. सध्या अनेक मराठी कलाकार मालिकेच्या प्रमोशनासाठी देखील इन्स्टा रील करत असतात. सध्या सोशल मीडियावर कुमारी गंगुबाई नॉनमॅट्रीक फेम अभिनेत्री निर्मिती सावंत (Nirmiti Sawant instagram reel)  यांचे एक रील सोशल मीडियावर प्रंचड व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे हे रील झी मराठीवरील सुप्रसिद्ध कार्यक्रम 'चला हवा येऊ द्या' च्या (Chala Hawa Yeu Dya) सेटवरील आहे. ही Insta Reel zee5 marathi च्या अधिकृत सोशल हँडलवर शेअर करण्यात आलं आहे. यामध्ये कॉमेडीची राणी अभिनेत्री निर्मिती सावंत सीनची रिहर्सल करताना दिसत आहे. यावेळी सेटवर त्यांच्यासोबत चला हवा येऊ द्या ची टीम देखील दिसत आहे. अभिनेत्री निर्मिती सावंत लाल रंगाच्या साडीत हुंभ हा...आ... थू....असं...काहीसं म्हणत आहेत व बाकीचे सर्वजण त्यांना पाहून जोराचे हसत आहेत. त्या तोंडातून वेगळा आवाज देखील काढून हसवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या नेमके काय म्हणतायत हे कळत नसलं तरी त्यांच्या अभिनय पाहून हसू अनावर होत आहे. सध्या त्यांचे हे इन्स्टा रील सोशल मीडियावर मात्र जोरदार व्हायरल होत आहे. वाचा : हास्याने लोटपोट करणाऱ्या 'अशी ही बनवाबनवी'ची ३३ वर्षे पूर्ण; स्वप्नील जोशीने लिहिली खास पोस्ट दुसऱ्याला हसवणे खूप अवघड काम आहे. मात्र चला हवा येऊ द्या ची टीम गेले किती तरी दिवस ते काम अगदी चोकपणे पार पाडत आहे. आता यामध्ये निर्मिती सावंत यांची भर पडली आहे. निर्मिती सावंत जेव्हा जेव्हा चला हवा द्यामध्ये आल्यात तेव्हा त्यांनी सर्वांचे मनोरंजन केले आहे. त्यांचे रील एवढे हसवणारे आहे तर मग हा भाग किती हसवणारा असेल याची कल्पना न केलेलीच बरी.
  View this post on Instagram

  A post shared by Zee5Marathi (@zee5_marathi)

  थुकरटवाडीतील प्रत्येक विनोदवीर प्रेक्षकांचे जोरात मनोरंजन करत असतो. कॉमेडीचे भन्नाट टायमिंग आणि धम्माल मस्ती यामुळे चला हवा येऊ द्या हा शो तुफान लोकप्रिय ठरला आहे. कुशल बद्रिके, सागर कारंडे, भारत गणेशपुरे, भाऊ कदम आणि श्रेया बुगडे रसिकांचे मनोरंजन करण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत. रसिकांना ते पोटधरून हसवतात.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Chala hawa yeu dya, Marathi entertainment

  पुढील बातम्या