Mission Mangal : अक्षयबरोबर विद्या, तापसी, सोनाक्षीसह या 5 जणी म्हणतायत 'पुरी दुनिया से कहो कॉपी दॅट'

Mission Mangal : अक्षयबरोबर विद्या, तापसी, सोनाक्षीसह या 5 जणी म्हणतायत 'पुरी दुनिया से कहो कॉपी दॅट'

Mission Mangal अक्षय सोबत दिवसरात्र झटलेल्या त्या पाच जणींची ही कथा.

  • Share this:

मुंबई, 18 जुलै : अक्षय कुमारचा(Akshay Kumar) बहुप्रतिक्षीत सिनेमा मिशन मंगल (Mission Mangal) मागच्या अनेक दिवसांपासून खूप चर्चेत आहे. या सिनेमात अक्षयने राकेश धवन नावाच्या वैज्ञानिकाची भूमिका साकारताना दिसत आहे. अक्षयसोबत विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा यांसारखे स्टार या सिनेमात आहेत. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा टीझर रिलीज झाला होता. यामध्ये सिनेमातील सर्व कलाकारांची एक झलक दाखवण्यात आली होती. त्यानंतर नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ज्याचं प्रेक्षकांकडून खूप कौतुक होत आहे.

‘मिशन मंगल’ या सिनेमात इस्रो वैज्ञानिकांच्या मेहनतीची कथा साकारण्यात आली आहे. एक रॉकेट अंतराळात पाठवण्यासाठी कशापद्धतीनं तयारी केली जाते याचं चित्रण या सिनेमात करण्यात आलं आहे. अंतराळ यान मंगळ ग्रहावर पाठवणं हे भारतासाठी खूप अभिमानाची गोष्ट होती. प्रक्षेपणाचा फार काही अनुभव नसतानाही नासाच्या मदतीवर अवलंबून न राहता आणि सर्व बाजूंनी फक्त नकार मिळत असतानाही हार न मानता मिशन मंगल यशस्वी करून दाखवणाऱ्या या वैज्ञानिकांची मेहनत या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आली आहे. ट्रेलरच्या अगदी शेवटी अक्षय कुमारचं वाक्य 'पुरी दुनिया से कहो कॉपी दॅट' हे वाक्य अक्षरशः अंगावर काटा आणतं. अक्षय सोबत दिवसरात्र झटलेल्या त्या पाच जणींची ही कथा.

Dabangg 3 मध्ये सलमानसोबत दिसणार 'हे' दोन मराठी चेहरे

हा सिनमा अशा वीरांची कथा जे भारताला मंगळ ग्रहापर्यंत घेऊन गेले. ताकद, साहस आणि कधीही पराभव न मानण्याची ही कथा आहे. मिशन मंगल ही मंगळ ग्रहावर भारताचं स्पेस पाठवण्याची खरी कहणी आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन जगन शक्ती यांनी केलं असून या सिनेमात अक्षय कुमार, विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, शर्मन जोशी, नित्या मेमन यांच्याही प्रमुख भूमिका आहे. येत्या 15 ऑगस्टला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

VIDEO : लग्न करण्याआधी विद्या बालनचा ‘हा’ सल्ला एकदा ऐकाच!

अक्षयनं मुलीसाठी साइन केला हा सिनेमा

अक्षय कुमारनं सोशल मीडियावर हा सिनेमा साइन करण्यामागचं खरं कारण सांगितलं. अक्षयने त्याच्या मुलीसाठी हा सिनेमा साइन केला होता. सोशल मीडियावर त्याने लिहिले की, ‘मला आशा आहे की मिशन मंगल हा सिनेमा जेवढं तुमचं मनोरंजन करेल तेवढा हा सिनेमा तुम्हाला प्रेरितही करेल. हा सिनेमा मी माझ्या मुलीसाठी आणि त्यांच्या वयाच्या मुलांसाठी केला आहे. जेणेकरून त्यांना मंगळ अभियानाची खरी घटना कळेल.’

काझीरंगा नॅशनल पार्कमधील प्राण्यांच्या मदतीला धावला अक्षय कुमार!

===========================================================================

पुण्यात अवतरला नवा गोल्डन मॅन, दररोज घालतो फक्त 5 किलो सोनं?

First published: July 18, 2019, 2:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading