Mision Mangal Trailer 2 : ...आणि चक्क अक्षय कुमारनं धरले विद्या बालनचे पाय!

Mision Mangal Trailer 2 : ...आणि चक्क अक्षय कुमारनं धरले विद्या बालनचे पाय!

पहिल्या ट्रेलरला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर आता 'मिशन मंगल'चा दुसरा ऑफिशियल ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

  • Share this:

मुंबई, 8 ऑगस्ट : अक्षय कुमारचा मिशन मंगल हा सिनेमा सध्या खूपच चर्चेत आहे. या सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला होता. ज्याचं सर्वत्र कौतुक झालं. मंगळ ग्रहावर भारताचं यान पाठवण्यासाठी भारतीय वैज्ञानिकांनी कशी मेहनत घेतली. त्यासाठी त्यांना काय खस्ता खाव्या लागल्या आणि त्यानंतर हे मिशन त्यांनी कशा पद्धतीनं पूर्ण करून दाखवलं याचं चित्रण या सिनेमात करण्यात आलं आहे. पहिल्या ट्रेलरला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर आता या सिनेमाचा दुसरा ऑफिशियल ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

मिशन मंगलचा हा दुसरा ट्रेलर आधीच्या ट्रेलरपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. पहिला प्रयत्न फसल्यानंतर इस्रोच्या वैज्ञानिकांचं पुन्हा एकदा त्याचं उमेदीनं उभं राहणं या ट्रेलरमध्ये दिसतं. याशिवाय यामध्ये थोडा विनोदी संवादांचा वापर करण्यात आला आहे. ‘मिशन मंगल’ यशस्वी करण्यासाठी विद्या बालनची एवढी धडपड आणि अफलातून आयडिया ऐकून अक्षय कुमार अक्षरशः तिचे पाय पकडताना दिसतो.

International Cat Day फिल्मस्टार्सची नक्कल करणाऱ्या या कॉपी CAT पाहिल्यात?

‘मिशन मंगल’ या सिनेमात इस्रो वैज्ञानिकांच्या मेहनतीची कथा साकारण्यात आली आहे. एक रॉकेट अंतराळात पाठवण्यासाठी कशापद्धतीनं तयारी केली जाते याचं चित्रण या सिनेमात करण्यात आलं आहे. अंतराळ यान मंगळ ग्रहावर पाठवणं हे भारतासाठी खूप अभिमानाची गोष्ट होती. प्रक्षेपणाचा फार काही अनुभव नसतानाही नासाच्या मदतीवर अवलंबून न राहता आणि सर्व बाजूंनी फक्त नकार मिळत असतानाही हार न मानता मिशन मंगल यशस्वी करून दाखवणाऱ्या या वैज्ञानिकांची मेहनत या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आली आहे.

'या' मराठमोळ्या हिरोईनसाठी दबंग सलमाननं सेटवर केली मोबाइल बंदी, कोण आहे 'ती'?

हा सिनमा अशा वीरांची कथा जे भारताला मंगळ ग्रहापर्यंत घेऊन गेले. ताकद, साहस आणि कधीही पराभव न मानण्याची ही कथा आहे. मिशन मंगल ही मंगळ ग्रहावर भारताचं स्पेस पाठवण्याची खरी कहणी आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन जगन शक्ती यांनी केलं असून या सिनेमात अक्षय कुमार, विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, शर्मन जोशी, नित्या मेमन यांच्याही प्रमुख भूमिका आहे. येत्या 15 ऑगस्टला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

Wonderful Sara! सारा अली खानच्या एअरपोर्ट लुकचं ऋषी कपूर यांनी केलं तोंडभर कौतुक

अक्षयनं मुलीसाठी साइन केला हा सिनेमा

अक्षय कुमारनं सोशल मीडियावर हा सिनेमा साइन करण्यामागचं खरं कारण सांगितलं. अक्षयने त्याच्या मुलीसाठी हा सिनेमा साइन केला होता. सोशल मीडियावर त्याने लिहिले की, ‘मला आशा आहे की मिशन मंगल हा सिनेमा जेवढं तुमचं मनोरंजन करेल तेवढा हा सिनेमा तुम्हाला प्रेरितही करेल. हा सिनेमा मी माझ्या मुलीसाठी आणि त्यांच्या वयाच्या मुलांसाठी केला आहे. जेणेकरून त्यांना मंगळ अभियानाची खरी घटना कळेल.’

===============================================================

VIDEO : महापुरात नको ते धाडस करू नका, राणादाने दिला हा सल्ला

Published by: Megha Jethe
First published: August 8, 2019, 4:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading