थरकाप उडवणारा Mardaani 2 Trailer पाहिल्यावर चुकेल तुमच्याही काळजाचा ठोका!

थरकाप उडवणारा Mardaani 2 Trailer पाहिल्यावर चुकेल तुमच्याही काळजाचा ठोका!

अभिनेत्री राणी मुखर्जीची प्रमुख भूमिका असलेल्या 'मर्दानी 2' चा हा ट्रेलर पाहिल्यावर अक्षरशः अंगावर काटा उभा राहतो.

  • Share this:

मुंबई, 14 नोव्हेंबर : अभिनेत्री राणी मुखर्जीची प्रमुख भूमिका असलेला सिनेमा ‘मर्दानी 2’ मागच्या काही काळापासून चर्चेत आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून हा ट्रेलर पाहिल्यावर काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहत नाही. यापूर्वी आलेल्या ‘मर्दानी’ या सिनेमाचा हा सिक्वेल असून राणी मुखर्जी अ‍ॅक्शन अवतार सर्वांचं लक्ष वेधून घेतो. सोशल मीडियावर या ट्रेलरला खूप चांगला प्रतिसाद मिळत असून प्रेक्षकांकडून राणीच्या अभिनयाचं कौतुक होत आहे.

सध्या देशभरात वेगवेगळया भागात होत असलेले बलात्कार हा सर्वांत मोठा चिंतेचा विषय आहे आणि या सिनेमात याच विषयावर प्रकाश टाकण्यात आला आहे. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलींना टार्गेट करुन त्यांच्यावर अमानुष अत्याचार करुन मग त्यांची हत्या करणाऱ्या खलनायकाला पकडणं हे सर्वात मोठं आव्हान राणी समोर आहे. ज्या पद्धतीनं हा खलनायक मुलींवर अत्याचार करुन त्यांचा खून करतो ते पाहिल्यावर अंगावर काटा उभा राहतो. राणी आपली टीम आणि सर्व कौशल्य पणाला लावून त्याला पकडण्याचा प्लान करते. पण हे एवढं सोपंही नाही.

विकी कौशल-कतरिना कैफ रिलेशनशिपमध्ये? डिनर डेटचे PHOTO VIRAL

दरम्यानं या बलात्कारी खलनायकाला पकडताना नायिकेसमोर अनेक समस्या येतात. ही आव्हानं आणि समस्या पार करून ती या गुन्हेगाराला पकडू शकेल का? की तिच्या समोर काही वेगळंच ताट वाढून ठेवलंय? या सगळ्याची उत्तर सिनेमा रिलीज झाल्यानंतरच मिळाणार आहेत. या ट्रेलरवर सध्या नेटीझन्सच्या सकारात्मक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. हा सिनेमा इतिहास घडवेल असं म्हटलं जात आहे. ट्रेलर पाहिल्यावर प्रेक्षकांची या सिनेमाविषयीची उत्सुकता आणखीच वाढली आहे.

दिग्दर्शकानं कट म्हणूनही KISS करत राहिले दीपवीर, अशी सुरू झाली होती Lovestory

'मर्दानी 2'मध्ये राणी मुखर्जी एका पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. जी एका चलाख आणि कुख्यात खलनायच्या शोधात तिच्या टीमचं प्रतिनिधित्व करणार आहे. पहिल्या पार्ट प्रमाणे या पार्टमध्येही राणी स्टंट सीन करताना दिसणार आहे. हा सिनेमा 13 डिसेंबरला रिलीज होणार.

डिसेंबरमध्ये एक-दोन नाही तर तब्बल 5 बिग बजेट सिनेमा रिलीज होणार आहेत. पानिपत-6 डिसेंबर, पति पत्नी और वो- 6 डिसेंबर, मर्दानी 2- 13 डिसेंबर, दबंग 3-20 डिसेंबर, आणि गुड न्यूज-27 डिसेंबर हे सर्व सिनेमा एकाच महिन्यात रिलीज होत आहेत. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर तगडी टक्कर पाहायला मिळणार आहे.

राखी सावंतच्या 'नकली पती'ला मेट्रोमध्ये महिलांनी बदडलं VIDEO व्हायरल

==================================================================

इंडियन आयडलच्या मंचावरचा खास अनुभव, पाहा रोहित राऊत EXCLUSIVE

Published by: Megha Jethe
First published: November 14, 2019, 1:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading