कंगना रणौतचा Dhakad Teaser रिलीज, नेटकरी म्हणाले ही तर...

कंगना रणौतचा Dhakad Teaser रिलीज, नेटकरी म्हणाले ही तर...

Dhakad Teaser नुकताच रिलीज झाला असून यामध्ये कंगना आतापर्यंतच्या सर्वात वेगळ्या लुकमध्ये दिसत आहे.

  • Share this:

मुंबई, 9 ऑगस्ट : बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत मागच्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. कधी नवा वाद तर कधी सिनेमा. मागच्या महिन्यात रिलीज झालेला तिचा सिनेमा ‘जजमेंटल है क्या’ वरून बरेच वाद झाले. मात्र त्यानंतरही या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. त्यानंतर आता कंगना लवकरच ‘धाकड’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचा टीझर नुकताच रिलीज झाला असून यामध्ये कंगना आतापर्यंतच्या सर्वात वेगळ्या लुकमध्ये दिसत आहे.

कंगनाच्या धाकड सिनेमाचा ट्रेलर खरं तर युट्यूब वरून काही वेळानंतर डिलीट करण्यात आला. मात्र तिच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ अजूनही पाहायला मिळत आहे. या व्हिडिओमध्ये कंगना लेडी रॅम्बो लुकमध्ये दिसत आहे. तिने हातात मोठी मशीनगन पकडली आहे आणि ती अगणित गोळ्या झाडताना दिसत आहे. कंगनाचा हा धाकड लुक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. तिच्या या टीझरवर सोशल मीडियावर खूप चांगल्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. या सिनेमासाठी कंगनाला 5 वा राष्ट्रीय पुरस्कार मिळणार असल्याचं बोललं जात आहे.

अरेरे! भूक-भूक करत अन्नाच्या शोधात विराट-अनुष्का आले रस्त्यावर, PHOTO VIRAL

कंगनाच्या या टीझरला प्रेक्षकांच्या सकारात्मक प्रतिक्रिया मिळत आहेत. एका युझरनं लिहिलं, कंगनाच्या प्रत्येक प्रयत्नाला सलाम जे ती तिच्या प्रत्येक सिनेमासाठी करते. ती महिलाप्रधान सिनेमांना प्राधान्य देत आहे आणि त्यासाठी तिला आपण सर्वांनी पाठिंबा द्यायला हवा. ती बॉलिवूडची वाघिण आहे. तर दुसऱ्या एका युजरनं लिहिलं, हा सिनेमा कंगना रणौतच्या बायोपिक सारखा वाटतं आहे. ती खऱ्या आयुष्यातही तेवढीच धाकड आहे.

बॉलिवूडच्या 'या' चॉकलेट हिरोनं बालपणाच्या मैत्रिणीशी गुपचूप केला साखरपुडा?

प्रेग्नंसीच्या 8 व्या महिन्यात ‘या’ अभिनेत्रीनं केलं टॉपलेस फोटोशूट

'या' मराठी हिरोईनचा पती आहे साउथचा रॉकस्टार, वापरतो 6 कोटींची व्हॅनिटी व्हॅन

========================================================

VIDEO: 'खायला दिलं पण खायची इच्छा नाही, मला माझा प्रपंच पाहिजे'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 9, 2019 06:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading