Jawaani Jaaneman Trailer: अम्मी का बेटा गे है! सैफचा स्वॅग आणि तब्बूचा ट्विस्ट

Jawaani Jaaneman Trailer: अम्मी का बेटा गे है! सैफचा स्वॅग आणि तब्बूचा ट्विस्ट

‘जवानी जानेमन’चा मजेदार ट्रेलर रिलीज झाला असून सैफ आणि तब्बू सुमारे 20 वर्षानंतर पडद्यावर एकत्र दिसत आहे.

  • Share this:

मुंबई, 09 जानेवारी : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि तब्बूचा आगामी चित्रपट 'जवानी जानेमन'चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. या ट्रेलरमध्ये सैफ अली खान आणि तब्बू यांच्यात मजेदार केमेस्ट्री दिसत आहे. ट्रेलरमध्ये सैफ आणि तब्बू मज्जा मस्ती करताना दिसत आहेत. या ट्रेलरच्या सुरुवातीलाच अम्मी का बेटा गे है, असे फरिदा जलाल म्हणतात. त्यावरून हा सिनेमा कॉमेडी असल्याचे कळत आहे.

या ट्रेलरमध्ये सैफ एक पार्टी दारुड्या (अल्कोहोलिक) माणूस दाखवण्यात आला आहे. मात्र सैफचा एक वेगळाच स्वॅग यात दिसत आहे. मात्र पण जेव्हा त्याच्या 21 वर्षांची मुलगी समोर येते तेव्हा त्याच्या आयुष्यात एक ट्विस्ट आहे. सर्वात मजेशीर गोष्ट म्हणजे सैफला त्याची मुलगी आहे हेदेखील माहित नसते. आणि येथूनच सैफच्या जीवनाचा खरा प्रवास सुरू होतो.

या सिनेमात तब्बूसुद्धा मुख्य भूमिकेत असून सैफ अली खानच्या पत्नीची भूमिका साकारत आहे, जरी ती बर्‍याच वर्षांपासून त्याच्यापासून दूर राहत होती. पण त्यांची ओळख करून देण्याची जबाबदारी दोघांची मुलगी घेते. त्यानंतर, तिघांचे आयुष्य उलट होते. एकंदरीत ट्रेलर खूपच मजेशीर आहे.

या चित्रपटाची आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे या चित्रपटातून पूजा बेदीची मुलगी आलिया एफ बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटात आलिया ही तब्बू आणि सैफच्या मुलीची भूमिका साकारत आहे. सैफ आणि तब्बूप्रमाणेच ट्रेलरमध्येही आलिया मस्त दिसत आहे. सैफ आणि तब्बू सुमारे 20 वर्षानंतर पडद्यावर एकत्र दिसत आहे. त्याआधी हे दोघे 'तू चोर में सिपाही', 'हम साथ साथ हैं' मध्ये दिसले होते. हा चित्रपट 31 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

First Published: Jan 9, 2020 06:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading