प्रिया बापटची नवी वेबसीरिज 'इथे' पाहायला मिळेल Free

प्रिया बापटची नवी वेबसीरिज 'इथे' पाहायला मिळेल Free

City of Dreams या गाजलेल्या वेबसीरिजनंतर प्रिया बापटची नवी वेब सीरिज आली आहे. 'आणि काय हवं?...' मध्ये Priya Bapat तिचा नवरा उमेश कामतबरोबरच काम करत आहे. ही वेबसीरिज मोफत कुठे पाहता येईल?

  • Share this:

मुंबई, 16 जुलै : City of Dreams या गाजलेल्या वेबसीरिजनंतर प्रिया बापटची नवी वेब सीरिज आली आहे. आणि काय हवं Aani Kay Have या नावाची ही वेबसीरिज मॅक्सप्लेअरवर बघता येईल. बऱ्याच वर्षांनी प्रिया या सीरिजमध्ये नवऱ्याबरोबर एकत्र दिसणार आहे. उमेश कामत Umesh Kamat आणि प्रिया बापट priya bapat यांची ही सीरिज आजपासूनच सुरू झाली आहे. मुख्य म्हणजे ही सीरिज पाहण्यासाठी प्रेक्षकांना कुठलंही वेगळं शुल्क द्यावं लागणार नाही. कारण मॅक्सप्लेअरवर ही सीरिज फ्री पाहता येणार आहे. प्रियाने स्वतः ही बातमी ट्वीट केली आहे.

प्रिया बापट आणि उमेश कामत यांचे फॅन्स खूप आहेत. या फॅन्ससाठी आता मोठी खूशखबर आहे. सात वर्षांनी दोघं पुन्हा एकत्र येऊन रसिकांना छान ट्रीट देणार आहेत.'आणि काय हवं?'या वेबसीरिजचं दिग्दर्शन वरुण नार्वेकरनं केलं आहे. वरुण नार्वेकरांनी यापूर्वी मुरांबा या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.अमेय वाघ आणि मिथिला पालकर यांनी या सिनेमात काम केलं होतं.

आणि काय हवं? या सीरिजचा प्रोमो रिलीज झाला, त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. या सीरिजमध्ये उमेश आणि प्रिया नव्यानं लग्न झालेलं एक आनंदी जोडपं दाखवलंय.

लग्न झालेल्या शहरी कपल्समध्ये अगदी घरगुती स्वरूपाचे गमतीशीर संवाद कसे होतील, त्यांच्या आयुष्यातल्या गमतीजमती या सीरिजमध्ये दाखवण्यात आल्या आहेत. खऱ्या आयुष्यातलं त्यांचं नवरा-बायकोचं नातं, नात्यातली सहजता या सीरिजमध्ये दिसण्याची प्रेक्षकांना अपेक्षा आहे. ही सीरिज बघण्यासाठी या लिंकवर क्लिक करा. इथे ती मोफत उपलब्ध आहे.

उमेश आणि प्रियानं 'टाइम प्लीज' या सिनेमात काम केलं होतं. त्यालाही आता सहा-सात वर्ष झाली. त्यानंतर दोघं एकत्र आले नव्हते. 'दादा एक गुडन्यूज आहे' हे नाटक प्रियानं प्रोड्युस केलं आणि उमेशची त्यात भूमिका आहे.

नागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल

काही दिवसांपूर्वी प्रिया बापटची 'सिटी आॅफ ड्रीम्स' सीरिज रिलीज झाली होती. त्यातल्या प्रियाच्या बोल्ड दृश्याची चर्चाही खूप झाली. या भूमिकेतला प्रियाचा किसिंग सीन व्हायरल झाला होता.

...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून!

'सिटी ऑफ ड्रिम्स' ही तिची करिअरमधली पहिली वेबसीरिज. पहिल्याच वेबसीरिजमध्ये प्रियाचा एवढा बोल्ड अवतार अनेकांच्या पचनी पडला नाही. त्यामुळे सोशल मीडियावर तिला अनेक प्रकारे ट्रोलही केलं गेलं.त्यांना तिनं खडसावून उत्तरंही दिली होती. या सीरिजमध्ये प्रियानं पौर्णिमा गायकवाडची भूमिका साकारली. ते बोल्ड दृश्य चांगलंच गाजलं होतं. प्रियाला वेबसीरिजचा अनुभव असला तरी उमेश कामतची ही पहिलीच वेबसीरिज आहे. 'वेबसीरिजमध्ये मी प्रियाला गुरू मानतो आणि तिच्याकडून धडे घेतोय. माझ्यासाठी हे माध्यम नवं आहे', असं उमेश एका मुलाखतीत म्हणाला होता.

VIDEO : 'मोठा आवाज झाला आणि काही सेंकदात इमारत कोसळली'

First published: July 16, 2019, 4:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading