Home /News /entertainment /

Netflix वर येणाऱ्या नोटबंदीवरच्या या थ्रिलर चित्रपटाची तुफान चर्चा; प्रमुख भूमिकेत आहेत सगळे मराठी कलाकार

Netflix वर येणाऱ्या नोटबंदीवरच्या या थ्रिलर चित्रपटाची तुफान चर्चा; प्रमुख भूमिकेत आहेत सगळे मराठी कलाकार

अनुराग कश्यपने मराठी कलाकारांना घेऊन नोटबंदीसारख्या विषयावर एक क्राइम थ्रिलर बनवला आहे. Netflix वर प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची झलक बघताच सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.

    मुंबई, 21 मे : प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या (Anurag Kashyap) नव्या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. Netflix वर प्रदर्शित होणारा Choked - Paisa bolta hai या चित्रपटात नोटबंदी ही कलाटणी देणारी गोष्ट दाखवली आहे. विशेष म्हणजे याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये बहुतेक सगळे मराठी कलाकार चमकताना दिसत आहेत. संयमी खेर, अमृता सुभाष, संजय नार्वेकर, राजश्री देशपांडे, रोशन मॅथ्यू आदी कलाकार आहेत. एका मध्यमवर्गीय घरातलं किचन आणि तुंबणारं बेसिन हा गोष्टीचा मेन प्लॉट आहे. ट्रेलर बघितल्यावर पंतप्रधान मोदींची नोटबंदीची घोषणा या घरातलं वातावरण कशी बदलून टाकते याची ही कहाणी वाटते. संयमी खेरने यात महत्त्वाची भूमिका केली आहे. किचनच्या सिंकमधून मिळणाऱ्या नोटा, अगतिक होणारी बँक कॅशिअर आणि टिपिकल मध्यमवर्गीय गृहिणी या सगळ्या साच्यात ती चपखल बसली आहे. संयमी खेर या भूमिकेबद्दल खूपच भरभरून बोलली आहे. या भूमिकेला सगळ्या शेड्स असल्याचं तिचं म्हणणं आहे. आनंद, उत्साह, भीती, क्रूरता अशा सगळ्या छटांची भूमिका मिळाल्याबद्दल तिने समाधान व्यक्त केलं आहे. अमृता सुभाष यापूर्वी सॅक्रेड गेम्ससारख्या अनेक वेबसीरिजमधून दिसली होती. पुन्हा एकदा तिला सशक्त भूमिका मिळाल्याचं दिसतं. राजश्री देशपांडे यापूर्वी सॅक्रेड गेम्समुळे चर्चेत होती. या गुणी अभिनेत्रीलाही या नव्या वेबचित्रपटात महत्त्वाची भूमिका असल्याचं सांगितलं जात आहे. याशिवाय Netflix वर रीलिज झालेल्या ट्रेलरमध्ये संजय नार्वेकरसुद्धा दिसतो. त्यामुळे बहुतेक सगळ्या मराठी कलाकारांना घेऊन केलेल्या या चित्रपटाची अनेकांना उत्सुकता आहे.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    पुढील बातम्या