मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /विना मास्क गल्लीतील क्रिकेट खेळताना दिसला Mr. Perfectionist; VIDEO पाहताच नेटिझन्सनी घेतली फिरकी

विना मास्क गल्लीतील क्रिकेट खेळताना दिसला Mr. Perfectionist; VIDEO पाहताच नेटिझन्सनी घेतली फिरकी

आमीर खानचा (Aamir Khan) गल्लीतल्या मुलांसोबत क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

आमीर खानचा (Aamir Khan) गल्लीतल्या मुलांसोबत क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

आमीर खानचा (Aamir Khan) गल्लीतल्या मुलांसोबत क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

  मुंबई, 08 जानेवारी : बॉलिवूडमधील (Bollywood) मि. परफेक्शनिस्ट(Mr. Perfectionist) म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमीर खान (Aamir Khan) याचा एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल (Social media viral) झाला आहे. यात तो मुंबईतील एका मैदानावर लहान मुलांसह क्रिकेट (Cricket) खेळताना दिसत आहे. पण त्याच्या या क्रिकेटपेक्षा नेटिझन्सची त्याला चांगलंच ट्रोल केलं आहे आणि याचं कारण म्हणजे त्यानं मास्क घातलेला नाही.

  आमिर खान लहान मुलांसोबत क्रिकेटचा आनंद लुटताना दिसला. फोर आणि सिक्सरही त्याने मारले. निळ्या रंगाचा टी-शर्ट आणि करड्या रंगाच्या ट्राऊझर्समध्ये असलेला आमीर खान खेळून झाल्यावर सर्वांबरोबर आनंदानं सेल्फी, ग्रुप फोटो काढताना दिसत आहे. हा व्हिडिओ विरल भयानी यानं इन्स्टाग्रामवरून शेअर केला असून, आतापर्यंत एक लाखापेक्षा अधिक वेळा पाहिला गेला आहे.

  आमीर खाननं (Aamir Khan) नुकताच आपल्या लग्नाचा 15 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी किरण राव, मुलगा आझाद राव खान आणि मुलगी इरा खान यांच्यासह गिर राष्ट्रीय उद्यानात गेला होता. तिथून मुंबईत परत आल्यावर गुरुवारी रस्त्यात थांबून त्यानं क्रिकेटचा आनंद घेतला.

  आमीर खान लवकरच ‘लाल सिंग चढ्ढा’ (Laal Singh Chaddha) चित्रपटात दिसणार आहे. दिग्दर्शक अद्वैत चौहान हा चित्रपट दिग्दर्शित करत असून, टॉम हँक्स अभिनित ‘फॉरेस्ट गंप’ (Forest Gump)या हॉलिवूड चित्रपटावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटात आमीर खानसोबत अभिनेत्री करीना कपूरदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आमीर आणि करीना यांनी याआधी थ्री इडियटस आणि तलाश या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. मोना सिंगही या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत आहे.

  क्रुरतेचा कळस! गंगा डॉल्फिनला रॉड, कुऱ्हाडीने जीवे मारतानाचा धक्कादायक VIDEO

  या वर्षाखेर हा चित्रपट प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे. आमीरनं या चित्रपटातील एका दृश्याचा फोटो आणि  व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या फोटोत करीना कपूर त्याला मिठी मारताना दिसत आहे. यावर आमीर खाननं ‘पा लेने की बेचैनी, और खो देने का डर, बस इतनासा है जिंदगी का सफर’ अशी कॅप्शन दिली आहे. या चित्रपटात सलमान खानही कॅमिओच्या भूमिकेत असून तो मैने प्यार किया चित्रपटातील प्रेम हे पात्र नव्यानं साकारताना दिसणार आहे.

  First published:

  Tags: Aamir khan