Home /News /entertainment /

'या' प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला वॉरंट जारी; कोर्टाने दिले हजर राहण्याचे आदेश

'या' प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला वॉरंट जारी; कोर्टाने दिले हजर राहण्याचे आदेश

बॉलिवूडच्या या बड्या अभिनेत्रीला वॉरंट जारी करण्यात आला आहे.

    मुंबई, 30 नोव्हेंबर-  यूटीएफ टेलिफिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या चेक बाऊन्स प्रकरणात अमिषा पटेलच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. भोपाळमधील जिल्हा न्यायालयाने अभिनेत्रीविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. यासोबतच न्यायालयाने आपल्या आदेशात अमिषा पटेलला ४ डिसेंबरला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. काय आहे प्रकरण- वास्तविक, हे प्रकरण 32.25 लाख रुपयांच्या चेक बाऊन्सचे आहे. यूटीपी टेलिफिल्म्स प्रायव्हेट लिमिटेडने हा गुन्हा दाखल केला आहे. कंपनीचा दावा आहे की, अभिनेत्रीने चित्रपट बनवण्यासाठी त्यांच्याकडून पैसे घेतले होते आणि अभिनेत्रीने कंपनीला दिलेले दोन चेक बाऊन्स झाले. UTF टेलिफिल्म्स प्रायव्हेट लिमिटेडचे ​​वकील रवी पंथ यांच्या मते, प्रथम श्रेणी जिल्हा न्यायाधीश रवी कुमार बोरासी यांनी अमिषा पटेल विरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. यूटीएफ टेलिफिल्म्स प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने त्यांनी भोपाळ कोर्टात केस दाखल केला होता. जामीनपात्र वॉरंट घेतल्यानंतर अमिषा ४ डिसेंबर रोजी जिल्हा न्यायालयात हजर झाली नाही. तर अटक वॉरंट जारी केले जाऊ शकते, असे त्यांनी सांगितले. इंदोरमध्येही आहे गुन्हा दाखल- तुम्हाला सांगतो की भोपाळ व्यतिरिक्त बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेलवर इंदोरमध्येही १० लाख रुपयांच्या चेक बाऊन्सप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Bollywood actress, Entertainment

    पुढील बातम्या