War Teaser: ज्याला आयडॉल मानलं त्याच्याच विरुद्ध उभा राहिला टायगर श्रॉफ

War Teaser: ज्याला आयडॉल मानलं त्याच्याच विरुद्ध उभा राहिला टायगर श्रॉफ

टीझरच्या पहिल्या फ्रेमपासून ते शेवटच्या फ्रेमपर्यंत तुफान अॅक्शन सीन पाहायला मिळतात. दोघांच्याही चाहत्यांनसाठी हा सिनेमा कोणत्याही ट्रीटपेक्षा कमी नसेल.

  • Share this:

मुंबई, 15 जुलै- हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांची धमाकेदार जोडी पाहण्याची सुवर्ण संधी बॉलिवूड प्रेक्षकांना मिळणार आहे. दोघंही आपल्या तुफान अॅक्शन सीनसाठी ओळखले जातात. बॉलिवूडच्या या तगड्या अॅक्शन स्टारच्या आगामी वॉस सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. संपूर्ण टीझरमध्ये दोघांचा एकही संवाद नाही. पण टीझरच्या पहिल्या फ्रेमपासून ते शेवटच्या फ्रेमपर्यंत तुफान अॅक्शन सीन पाहायला मिळतात. दोघांच्याही चाहत्यांनसाठी हा सिनेमा कोणत्याही ट्रीटपेक्षा कमी नसेल. बाइकपासून ते प्लेनपर्यंत प्रत्येक स्टंटमध्ये टागर आणि हृतिक आपली किमया दाखवताना दिसत आहेत.

यशराज बॅनर अंतर्गत तयार करण्यात आलेल्या या सिनेमात टायगर आणि हृतिकसोबत वाणी कपूरचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. टीझरच्या अनेक सीनमध्ये टागर हृतिकचा पाठलाग करताना दाखवण्यात आला आहे. गांधी जयंतीच्या मुहुर्तावर अर्थात 2 ऑक्टोबरला हा सिनेमा देशभरात प्रदर्शित होणार आहे. सिनेमात आंतरराष्ट्रीय दर्जाचे अॅक्शन सीन दाखवण्यात आले आहेत. वॉरचा टीझर पाहताना स्टंट आणि अॅक्शनवर आंतरराष्ट्रीय दर्जाचं काम करण्यात आल्याचं स्पष्ट दिसतं.

सिद्धार्थ आनंदने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून आदित्य चोप्राने सिनेमाची निर्मिती केली आहे. या सिनेमाबद्दल बोलताना सिद्धार्थ म्हणाला होता की, 'भारतात आतापर्यंत तयार करण्यात आलेल्या अॅक्शनपटांपेक्षा सर्वोत्तम अॅक्शनपट आम्हाला तयार करायचा होता. आतापर्यंत जगाने पाहिले नसतील असे अविस्मरणीय अॅक्शन सीन डिझाइन केले जावे यासाठी पहिल्यांदा आम्ही जगातील दोन बड्या अॅक्शन कोरिओग्राफरना एकत्र आणलं आहे.'

'एकीकडे आमच्याकडे हॉलिवूडचे अँडी आर आर्मस्ट्राँग आहेत,  ज्यांनी 'द अमेझिंग स्पायडर मॅन', 'अमेझिंग स्पायडर मॅन 2', 'चार्ली एंजल्स' आणि 'प्लेनेट ऑफ द एप्स' या सिनेमांसाठी अॅक्शन कोरिओग्राफी केली. तर दुसरीकडे श्री ओह, ज्यांनी 'अॅवेंजर्स- एज ऑफ अल्टरॉन' या सिनेमाची अॅक्शन कोरिओग्राफी केली होती. श्री ेहे दक्षिण कोरियातले सर्वोत्कृष्ट मार्शल आर्ट अॅक्शन कोरिओग्राफर आहेत. बॉलिवूडसाठी पूर्व आणि पश्चिममधील दिग्गजांना एकत्र आणल्याचं आम्हाला आनंद आहे.'

कतरिनाच्या बिकीनी फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ, Viral फोटो तुम्हीही कराल Forword

Bigg Boss Marathi 2- ‘शिवानीला नादीच लावतो’, घरात सुरू आहे फुल टू राडा

...म्हणून अक्षय कुमारचा मुलगा क्रिकेटचा द्वेष करतो

VIDEO: सलमान खानने केलं 'Bottle Cap Challenge'; सगळ्यांची बोलती झाली बंद!

First published: July 15, 2019, 12:24 PM IST

ताज्या बातम्या