'गद्दारी तो आपने सिखाई नहीं', पाहा ऋतिक-टायगरचा अ‍ॅक्शनपॅक War Trailer

हृतिक आणि टायगर दोघंही या ट्रेलरमध्ये जबरदस्त अ‍ॅक्शन अवतारात दिसत आहेत.

News18 Lokmat | Updated On: Aug 27, 2019 11:17 AM IST

'गद्दारी तो आपने सिखाई नहीं', पाहा ऋतिक-टायगरचा अ‍ॅक्शनपॅक War Trailer

मुंबई, 27 ऑगस्ट : अभिनेता हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांचा WAR हा सिनेमा मागच्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. या सिनेमात टायगर आणि हृतिक एकमेकांना भिडताना दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा टीझर रिलीज झाला असून याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला असून याला प्रेक्षकांची वाहावा मिळत आहे. यात टायगर आणि हृतिक यांच्या अ‍ॅक्शन सीन्सनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

टायगर श्रॉफ आणि हृतिक रोशन यांच्यामध्ये या सिनेमात गुरू शिष्याचं नातं दाखवण्यात आलं आहे. मात्र असं असतानाही टायगर हृतिकच्या विरोधात जातो आणि त्याच्यात सुरू होतं वॉर. त्याची ही कथा. हृतिक आणि टायगर दोघंही या ट्रेलरमध्ये जबरदस्त अ‍ॅक्शन अवतारात दिसत आहेत. याशिवाय या सिनेमात अभिनेत्री वाणी कपूरचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे मात्र ट्रेलरमध्ये तिच्या भूमिकेवरून अद्याप पडदा उठलेला नाही. टायगर श्रॉफ नेमका आपल्या गुरूच्या विरोधात का उभा राहतो आणि या वॉरचा शेवट काय याविषयीची उत्सुकता या ट्रेलरमुळे आता ताणली गेली आहे.

स्टेशनवर गाणाऱ्या रानू यांना हिमेश रेशमियाने पहिल्याच गाण्यासाठी दिली एवढी रक्कम

वाणी कपूरनं या सिनेमासाठी तिच्या फिटनेसवर विशेष मेहनत घेतली आहे. या सिनेमातील तिचा लुक रिलीज झाल्यावर त्याची सगळीकडेच खूप चर्चाही झाली होती. खासकरून या सिनेमातील तिचा बिकिनी लुक सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. गांधी जयंतीच्या मुहुर्तावर अर्थात 2 ऑक्टोबरला हा सिनेमा देशभरात प्रदर्शित होणार आहे. सिनेमात आंतरराष्ट्रीय दर्जाचे अ‍ॅक्शन सीन दाखवण्यात आले आहेत. वॉरचा ट्रेलर पाहताना स्टंट आणि अ‍ॅक्शनवर आंतरराष्ट्रीय दर्जाचं काम करण्यात आल्याचं स्पष्ट दिसतं.

Loading...

विद्या बालन म्हणाली, 'दिग्दर्शक मला एकटीला रूममध्ये घेऊन गेला आणि...'

सिद्धार्थ आनंदने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून आदित्य चोप्राने सिनेमाची निर्मिती केली आहे. या सिनेमाबद्दल बोलताना सिद्धार्थ म्हणाला होता की, 'भारतात आतापर्यंत तयार करण्यात आलेल्या अ‍ॅक्शनपटांपेक्षा सर्वोत्तम अ‍ॅक्शनपट आम्हाला तयार करायचा होता. आतापर्यंत जगाने पाहिले नसतील असे अविस्मरणीय अ‍ॅक्शन सीन डिझाइन केले जावे यासाठी पहिल्यांदा आम्ही जगातील दोन बड्या अ‍ॅक्शन कोरिओग्राफरना एकत्र आणलं आहे.'

प्रेग्नंट अॅमी जॅक्सनने प्रियकरासोबत पूलमध्ये केलं एन्जॉय, PHOTOS VIRAL

'एकीकडे आमच्याकडे हॉलिवूडचे अँडी आर आर्मस्ट्राँग आहेत,  ज्यांनी 'द अमेझिंग स्पायडर मॅन', 'अमेझिंग स्पायडर मॅन 2', 'चार्ली एंजल्स' आणि 'प्लेनेट ऑफ द एप्स' या सिनेमांसाठी अ‍ॅक्शन कोरिओग्राफी केली. तर दुसरीकडे श्री ओह, ज्यांनी 'अ‍ॅवेंजर्स- एज ऑफ अल्टरॉन' या सिनेमाची अ‍ॅक्शन कोरिओग्राफी केली होती. श्री हे दक्षिण कोरियातले सर्वोत्कृष्ट मार्शल आर्ट अ‍ॅक्शन कोरिओग्राफर आहेत. बॉलिवूडसाठी पूर्व आणि पश्चिममधील दिग्गजांना एकत्र आणल्याचं आम्हाला आनंद आहे.' असं सिद्धार्थ आनंद म्हणाला.

========================================================

ट्रम्प यांनी घेतली फिरकी, मोदींनी दिली सॉलिड टाळी, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 27, 2019 11:09 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...