• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • ‘मुली पटवण्यासाठी टीप्स दे’; चाहत्याचा प्रश्न पाहून Shahrukh संतापला, म्हणाला...

‘मुली पटवण्यासाठी टीप्स दे’; चाहत्याचा प्रश्न पाहून Shahrukh संतापला, म्हणाला...

शाहरुखनं देखील त्या प्रश्नांची उत्तर दिली. दरम्यान एका चाहत्यानं त्याच्याकडे मुली पटवण्यासाठी काही टीप्स मागितल्या. मात्र हा प्रश्न पाहून शाहरुख संतापला. तो म्हणाला....

 • Share this:
  मुंबई 31 मार्च: बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) गेल्या काही काळापासून सिनेसृष्टीपासून दूर आहे. मात्र सोशल मीडियाद्वारे तो कायम चर्चेत असतो. अलिकडेच त्यानं आपल्या चाहत्यांशी संपर्क साधण्यासाठी ट्विटरवर आस्क मी एनिथिंग (ask me anything) हे लाईव्ह सेशन केलं होतं. यामध्ये चाहत्यांनी त्याला अनेक खासगी प्रश्न विचारले अन् शाहरुखनं देखील त्या प्रश्नांची उत्तर दिली. दरम्यान एका चाहत्यानं त्याच्याकडे मुली पटवण्यासाठी काही टीप्स मागितल्या. मात्र हा प्रश्न पाहून शाहरुख संतापला. तो म्हणाला.... शाहरुख खानला रोमान्सचा किंग असं म्हटलं जातं. त्यानं आपल्या अनेक चित्रपटांमध्ये रोमँटिक भूमिका साकारल्या आहेत. या पार्श्वभूमीवर एका चाहत्यानं त्याच्याकडे मुली पटवण्यासाठी काही टीप्स मागितल्या. मात्र हा प्रश्न पाहून तो संतापला. “सर्वात प्रथम मुलींचा आदर करायला शिक. मुली पटवायला असे शब्द प्रयोग करु नकोस. मुलींना सन्मान दे आणि प्रयत्न कर” अशा आशयाचं ट्विट करुन शाहरुखनं आपला राग व्यक्त केला. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. अवश्य पाहा - “मस्त तेल मे फ्राई करके खा गया”; पाहा हेरा फेरीमधील खळखळवून हसवणारे मिम्स शाहरुख खान येत्या काळात पठाण या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत जॉन अब्राहम आणि दीपिका पदुकोण देखील मुख्य व्यक्तिरेखा साकारणार आहेत. हा चित्रपट गुप्तहेर संघटनेच्या कारवायांवर आधारित असेल व या चित्रपटात शाहरुख एका अंडरक्वहर गुप्तहेरांच्या भूमिकेत झळकणार असं म्हटलं जात आहे.
  Published by:Mandar Gurav
  First published: