मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /बाहुबलीमध्ये मोठा बदल; मराठी ऐवजी आता पंजाबी अभिनेत्री साकारणार शिवगामीची भूमिका

बाहुबलीमध्ये मोठा बदल; मराठी ऐवजी आता पंजाबी अभिनेत्री साकारणार शिवगामीची भूमिका

'बाहुबली: बिफोर द बिगनिंग' (Baahubali Before the Beginning) असं या आगामी सीरिजचं नाव आहे. मृणाल ठाकूर गेले काही महिने या सीरिजमुळं चर्चेत होती.

'बाहुबली: बिफोर द बिगनिंग' (Baahubali Before the Beginning) असं या आगामी सीरिजचं नाव आहे. मृणाल ठाकूर गेले काही महिने या सीरिजमुळं चर्चेत होती.

'बाहुबली: बिफोर द बिगनिंग' (Baahubali Before the Beginning) असं या आगामी सीरिजचं नाव आहे. मृणाल ठाकूर गेले काही महिने या सीरिजमुळं चर्चेत होती.

मुंबई 20 एप्रिल: बाहुबली (Baahubali) हा भारतीय सिनेसृष्टीतील आजवरच्या सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो. 'बाहुबली: द बिगनिंग' आणि 'बाहुबली: द कनक्ल्युजन' (Baahubali: The Beginning and Baahubali 2: The Conclusion) या दोन चित्रपटांच्या सीरिजनं प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं. या चित्रपटाची तुलना हॉलिवूडपट अवतारशी देखील केली जाते. जवळपास 2 हजार कोटी रुपयांची कमाई करणाऱ्या या चित्रपटाचा प्रिक्वल आता लवकर प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. परंतु या सीरिजमधून अभिनेत्री मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) हिला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

'बाहुबली: बिफोर द बिगनिंग' (Baahubali Before the Beginning) असं या आगामी सीरिजचं नाव आहे. मृणाल ठाकूर गेले काही महिने या सीरिजमुळं चर्चेत होती. ती या सीरिजमध्ये शिवगामी ही मुख्य व्यक्तिरेखा साकारणार होती. परंतु काही कारणास्तव निर्मात्यांनी तिला या सीरिजमधून बाहेर केलं आहे. तिच्यासोबत आणखीही काही कलाकार बदलण्यात आले आहेत. परिणामी मृणालच्या जागी आता अभिनेत्री वामिका गाबी हिची वर्णी लागली आहे. कलाकार बदलण्याचं नेमकं कारण निर्मात्यांनी अद्याप स्पष्ट केलेलं नाही. मात्र वामिका एक मेथड अक्टर आहे. ती या भूमिकेला योग्य प्रकारे न्याय देऊ शकेल अशी अपेक्षा निर्मात्यांनी व्यक्त केली आहे.

अवश्य पाहा - अभिनेत्रीसोबत घडला अजब प्रकार; चाहता फोटो काढायला आला अन् किस करुन गेला

View this post on Instagram

A post shared by Wamiqa Gabbi (@wamiqagabbi)

बाहुबली ही दोन चित्रपटांची सीरिज सुपरहिट झाल्यानंतर तोच फॉर्म्युला पुन्हा एकदा वापरण्याचा निर्णय नेटफ्लिक्सनं घेतला आहे. बाहुबलीचा जन्म होण्यापूर्वी कुठल्या घडामोडी घडल्या होत्या? हा प्रश्न वारंवार प्रेक्षकांद्वारे विचारला जात होता. अखेर प्रेक्षकांच्या आग्रहास्तव दिग्दर्शक एस. एस. राजामौली एका नव्या वेब सीरिजची निर्मिती करत आहेत. या सीरिजसाठी नेटफ्लिक्सनं आतापर्यंत तब्बल 200 कोटी रुपये खर्च केले आहेत. अन् रिशूटमुळं बजेटमध्ये आता आणखी 100 कोटींची वाढ केल्याचं म्हटलं जात आहे.

First published:
top videos

    Tags: Baahubali, Bold photoshoot, Bollywood actress, Entertainment, Web series