'माझ्यासाठी प्रार्थना करा, लवकरच भेटू' वाजिद यांचा शेवटचा फोन कॉल Viral

'माझ्यासाठी प्रार्थना करा, लवकरच भेटू' वाजिद यांचा शेवटचा फोन कॉल Viral

वाजिद खान यांचा शेवटचा फोन कॉल सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

  • Share this:

मुंबई, 1 जून : बॉलिवूडचा प्रसिद्ध संगीतकार वाजिद खान यांचं किडनीच्या आजारानं निधन झालं. वयाच्या 42 वर्षीच त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या अशा अचानक जाण्यानं संपूर्ण बॉलिवूडला धक्का बसला आहे. मागच्या महिन्याभरात बॉलिवूडनं अनेक कलाकार गमावले आहेत. वाजिद मागच्या 2 महिन्यांपासून हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. त्यावेळी सिंगर मीका सिंहने त्यांना कॉल केला होता. त्यांचा हा फोन कॉल सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेली ही मिका आणि वाजिद यांच्या फोन कॉलची ऑडिओ क्लिप पीपिंग मून या वेबसाईटने आपल्या युट्यूब चॅनेलवर पोस्ट केली आहे. मिका सिंग याने वाजिद यांची विचारपूस करण्यासाठी फोन केला होता. यावेळी त्यांनी एकत्र काम करण्याची इच्छाही व्यक्त केली. यावर वाजिद म्हणाले होते, 'धन्यवाद, तुझा मेसेज वाचून खूप आनंद झाला. सध्या मी ठिक होत आहे. देवाने कृपा केली तर लवकरच मी ठिक होईन. तुमच्या पाठिंब्यासाठी धन्यवाद. माझ्यासाठी प्रार्थना करा. आपण लवकरच भेटू.'

याशिवाय सोशल मीडियावर वाजिद यांचा एक व्हिडीओ सुद्धा व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये वाजिद खान हॉस्पिटलमध्ये बेडवर बसून सलमानच्या दबंग सिनेमाचं टायटल साँग हुडहुड दबंग गाताना दिसत आहेत. व्हिडीओ जर्नलिस्ट विरल भयानी यांनी वाजिदचा हा व्हिडीओ त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हॉस्पिटलमध्ये असतानाही वाजिद स्वतःच्याच अंदाजात सलमानच्या सिनेमातलं हे गाणं असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सगळीकडे व्हायरल झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A heart breaking old video of #wajidkhan . This is not a recent video. #rip

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

किडनीच्या आजारामुळे वाजिद यांना 60 दिवसांपूर्वी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. काही काळापूर्वी त्यांच्यावर मूत्रपिंडाचं प्रत्यारोपणही झालं होतं. तीन दिवसांपूर्वी त्यांची कोरोनाची लक्षण दिसल्यानं चाचणी करण्यात आली. हा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळत आहे. त्यांना मधुमेहाचा त्रासही होता. वाजिद यांच्या निधनानंतर संपूर्ण बॉलिवूड शोकसागरात बुडालं आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

अरे ही तर कार्बन कॉपी! करिश्मासारखी दिसणारी 'ती' नक्की आहे तरी कोण?

सनी लिओनीनं सांगितलं सत्य, इंटीमेट सीन शूट करताना कशी असते सेटवरील परिस्थिती

First published: June 1, 2020, 5:16 PM IST
Tags: Bollywood

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading