मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

"धर्म बदल नाहीतर..." वाजिद खान द्यायचा धमक्या; पत्नीचा खळबळजनक गौप्यस्फोट

"धर्म बदल नाहीतर..." वाजिद खान द्यायचा धमक्या; पत्नीचा खळबळजनक गौप्यस्फोट

वाजिद खान (Wajid Khan) यांच्या पत्नीने सासरच्या मंडळींवर धर्मपरिवर्तनाबाबत काही दिवसांपूर्वी आरोप केले होते. आता खुद्द वाजिद खानवरही त्यांनी आरोप केले आहेत.

  मुंबई, 20 डिसेंबर: संगीतकार वाजिद खानच्या (Wajid Khan) निधनाला 6 महिने पूर्ण झाले आहेत. दीर्घकालीन आजारामुळे 1 जून 2020 रोजी त्याने अखेरचा श्वास घेतला. त्याच्या निधनाने संगीत, कलाविश्वासह चाहत्यांनाही मोठी धक्का बसला होता. वाजिदच्या निधनानंतर त्यांची पत्नी कमालरुख खानने आपल्या सासरच्यांवर गंभीर आरोप केले होते.कमालरुख यांनी आधी वाजिदच्या कुटुंबावर आरोप केले होते. आता वाजिदवरही आरोप केल्यामुळे खळबळ माजली आहे. एका मुलाखतीमध्ये दिलेल्या माहितीनुसार वाजिद खान यांच्या पत्नीने सांगितलं, ‘माझा नवरादेखील माझ्यावर धर्मपरिवर्तनासाठी दबाव टाकत होता. एवढंच नाही तर त्याने मला घटस्फोट देण्याची धमकीही दिली होती' असंही त्या म्हणाल्या. जवळजवळ 6 वर्ष त्या साजिदपासून वेगळ्या राहिल्या होत्या. वाजिदने 2014 मध्ये मला घटस्फोट देण्यासाठी अर्जदेखील केला होता पण तो घटस्फोट होऊ शकला नाही.’ कमालरुख खान यांनी याबद्दल सोशल मीडियावर पोस्टही शेअर केली आहे. कमालरुख आणि वाजिद खान यांनी इंटर कास्ट मॅरेज अर्थात आंतरजातीय विवाह केला होता. त्यामुळे आता धर्म परिवर्तनासाठी दवाब आणला जात असल्याचा आरोप वाजिद खान यांच्या पत्नीने केला होता.
  कमालरुखने सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट लिहिली होती. 'मी पारसी होते आणि वाजिद मुस्लीम. आम्ही दोघांनी स्पेशल मॅरेज ऍक्टअतंर्गत लग्न केलं. मी याबाबत माझा अनुभव शेअर करते की, कशाप्रकारे इंटरकास्ट मॅरेजनंतर आता माझ्यासोबत धर्माच्या आधारे भेदभाव केला जात आहे. हे अतिशय लज्जास्पद असून सर्वांचेच डोळे उघडवणारं आहे' अशा आशयाची पोस्ट तिने केली आहे. वाजिद खान यांच्या अस्वास्थ्यामुळे मे 2020 मध्ये त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र 1 जून रोजी त्यांचं निधन झालं.
  Published by:Amruta Abhyankar
  First published:

  Tags: Bollywood

  पुढील बातम्या