मुंबई, 7 जून : बॉलिवूडचे प्रसिद्ध संगीतकार वाजिद खान यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. त्यांचं निधन हे कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे झालं असल्याचं बोललं जात होतं. याशिवाय त्याचं किडनी प्रत्यारोपण करण्यात आलं होतं. पण यासोबतच त्यांचा कोरोना रिपोर्ट सुद्धा पॉझिटिव्ह आला होता. मात्र आता या सर्व गोष्टींना वाजिद यांच्या कुटुंबीयांनी पूर्णविराम दिला आहे. नुकत्याच दिलेल्या एका स्टेटमेंटमध्ये त्यांनी वाजिद यांच्या निधनाचं खरं कारण स्पष्ट केलं आहे.
वाजिद खान यांचा भाऊ साजिद खान यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी भाऊ वाजिदच्या निधनाचं खरं कारणं स्पष्ट केलं आहे. त्यांनी लिहिलं, आमच्या प्रिय वाजिदचं निधन वयाच्या 47 व्या वर्षी कार्डियक अरेस्टमुळे झालं. 1 जून रात्री 12.30 ला त्यानं सेठिया हॉस्पिटलमध्ये शेवटचा श्वास घेतला. मागच्या वर्षीच त्याचं किडनी ट्रान्सप्लांट झालं होतं आणि त्याच्या थ्रोट इन्फेक्शनवर उपचार सुरू होते. साजिद यांनी त्यांच्या पोस्टमध्ये कुठेच वाजिद खान यांना कोरोना संक्रमण झाल्याचा उल्लेख केलेला नाही.
तापसी पन्नू ठरली सर्वात यशस्वी अभिनेत्री, अवघ्या वर्षभरात कमावले एवढे कोटी
View this post on Instagram
बॉलिवूडमध्ये साजिद-वाजिद या जोडीची वेगळी ओखळ होती. 1998 मध्ये त्यांनी सलमानच्या 'प्यार किया तो डरना क्या' या सिनेमाला संगीत दिलं होतं. 1999 मध्ये सोनू निगमचा अल्बम 'दीवाना'साठी त्यांनी संगीत दिलं. ज्यात 'दीवाना तेरा', 'अब मुझे रात दिन' आणि 'इस कदर प्यार है' ही गाणी होती. त्याच वर्षी पुन्हा त्यांनी सलमानच्या 'हॅलो ब्रदर'साठी संगीत दिग्दर्शक म्हणून काम केलं. या सिनेमासाठी त्यांनी 'हटा सावन की घाटा', 'चुपके से कोई और' आणि 'हॅलो ब्रदर' ही गाणी लिहिली होती. याशिवाय वाजिदनं काही गाणी सुद्धा लिहिली होती.
FIR नंतर हिंदुस्तानी भाऊची एकता कपूरला लीगल नोटीस, जाणून घ्या काय आहे प्रकरण
अमिताभ-आयुष्मान यांच्या चित्रपटावर संकट; लेखिकेवर संहिता चोरल्याचा आरोप
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood