VIDEO : वाजिद यांच्या निधनानंतर VIRAL होतंय त्यांनी हॉस्पिटलमध्ये गायलेलं हे 'दबंग' गाणं

VIDEO : वाजिद यांच्या निधनानंतर VIRAL होतंय त्यांनी हॉस्पिटलमध्ये गायलेलं हे 'दबंग' गाणं

सलमान खानच्या पार्टनर, दबंग, वॉन्टेड सारख्या सुपरहिट सिनेमांना संगीत देणाऱ्या वाजिद खान यांनी वयाच्या 42 वर्षीच जगाचा निरोप घेतला.

  • Share this:

मुंबई, 1 जून : प्रसिद्ध संगीतकार वाजिद खान यांचं आज निधन झालं. सलमान खानच्या पार्टनर, दबंग, वॉन्टेड सारख्या सुपरहिट सिनेमांना संगीत देणाऱ्या वाजिद खान यांनी रविवारी रात्री वयाच्या 42 वर्षीच जगाचा निरोप घेतला. सलमान खानसोबत साजिद-वाजिद ही जोडी नेहमीच सुपरहिट ठरली. सध्या बॉलिवूडमध्ये वाजिदच्या निधनवर हळहळ व्यक्त केली जात आहे. अशात आता वाजिदचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये वाजिद खान हॉस्पिटलमध्ये बेडवर बसून सलमानच्या दबंग सिनेमाचं टायटल साँग हुडहुड दबंग गाताना दिसत आहे. व्हिडीओ जर्नलिस्ट विरल भयानी यांनी वाजिदचा हा व्हिडीओ त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हॉस्पिटलमध्ये असतानाही वाजिद स्वतःच्याच अंदाजात सलमानच्या सिनेमातलं हे गाणं असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सगळीकडे व्हायरल झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A heart breaking old video of #wajidkhan . This is not a recent video. #rip

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

किडनीच्या आजारामुळे वाजिद यांना 60 दिवसांपूर्वी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. काही काळापूर्वी त्यांच्यावर मूत्रपिंडाचं प्रत्यारोपणही झालं होतं. तीन दिवसांपूर्वी त्यांची कोरोनाची लक्षण दिसल्यानं चाचणी करण्यात आली. हा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळत आहे. त्यांना मधुमेहाचा त्रासही होता. वाजिद यांच्या निधनानंतर संपूर्ण बॉलिवूड शोकसागरात बुडालं आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

बॉलिवूडमच्या अनेक कलाकारांनी वाजिद खान यांना ट्वीट करून श्रद्धांजली वाहिली आहे. 'प्रसिद्ध सारेगमप 2012, 'सारेगमप सिंगिंग सुपरस्टार' या शोसाठी त्यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं होतं. वाजिद-साजिद या जोडगोळीनं वॉन्टेड', 'मुझसे शादी करोगी', 'एक था टायगर', 'दबंग' या सिनेमातील गाणी संगीतबद्ध केली आहे.

सनी लिओनीनं सांगितलं सत्य, इंटीमेट सीन शूट करताना कशी असते सेटवरील परिस्थिती

नर्गिस यांनी ब्लेडनं हात कापून घेत केला होता आत्महत्येचा प्रयत्न

First published: June 1, 2020, 3:36 PM IST
Tags: Bollywood

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading