Home /News /entertainment /

गुरुदत्त यांचं वहिदा रेहमान यांच्यावर होतं प्रेम; का राहिली त्यांची love story अर्धवट?

गुरुदत्त यांचं वहिदा रेहमान यांच्यावर होतं प्रेम; का राहिली त्यांची love story अर्धवट?

आपलं सर्वस्व सोडून वहिदा यांच्यासोबत राहायला तयार होते. (Waheeda Rehman and Guru Dutts love story) दोघांचंही एकमेकांवर प्रेम होतं तरी देखील त्यांची लव्हस्टोरी अर्धवट राहिली...

    मुंबई 14 मे: वहिदा रेहमान (Waheeda Rehman) या बॉलिवूडमधील एक नामांकित अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. 60-70 च्या दशकांत तरुणांमध्ये त्यांची प्रचंड क्रेझ होती. केवळ त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहतावर्ग सिनेमागृहांमध्ये गर्दी करत असे. अशा या अभिनेत्रीच्या सौंदर्यावर त्याकाळचे नामांकित दिग्दर्शक, निर्माते गुरुदत्त (Guru Dutts) देखील प्रेमात पडले होते. गुरुदत्त यांचं लग्न झालं होतं. त्यांना तीन मुलं होती पण ते आपलं सर्वस्व सोडून वहिदा यांच्यासोबत राहायला तयार होते. (Waheeda Rehman and Guru Dutts love story) दोघांचंही एकमेकांवर प्रेम होतं तरी देखील त्यांची लव्हस्टोरी अर्धवट राहिली... गुरुदत्त यांनी एका पार्टीमध्ये वहिदा रेहमान यांना पाहिलं होतं. पाहताक्षणी ते त्यांच्या प्रेमात पडले. अन् त्यांनी आपल्या चित्रपटांमध्ये काम करावी अशी विंनती वहिदा यांना केली. रेहमान यांना देखील अभिनयाची आवड होती. शिवाय गुरुदत्त त्याकाळचे लोकप्रिय कलाकार होते. परिणामी त्यांनी त्वरित होकार दिला. मग त्यांनी 'प्यासा', 'चौदहवीं का चांद', 'कागज़ के फूल', 'साहिब', 'बीवी और गुलाम' यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती केली. चित्रपटाच्या निमित्तानं एकत्र आलेले वहिदा रेहमान आणि गुरुदत्त एकमेकांच्या प्रेमात पडले. सोनूला भेटली भारतातील सर्वात श्रीमंत महिला, तिच्या मदतीने झाला भावुक परंतु गुरुदत्त विवाहित होते. शिवाय त्यांना तीन मुलं होती. त्यामुळं दोन्ही कुटुंबीयांना त्यांचं हे नातं मान्य नव्हतं. या प्रकरणामुळं गुरुदत्त यांची मुलं, पत्नी त्यांना सोडून गेले. अन् दुसरीकडे कुटुंबीयांच्या विरोधामुळं वहिदा रेहमान देखील त्यांच्या आयुष्यात राहणार नव्हत्या. अखेर एकामागून एक घडणाऱ्या या घटनांमुळं ते नैराश्येत गेले. आयुष्यातील या कठीण प्रसंगी ते एकटे पडले होते. शेवटी वयाच्या 39 व्या वर्षी त्यांनी आत्महत्या करुन आपलं आयुष्य संपवलं. परिणामी वहिदा रेहमान आणि गुरुदत्त यांची लव्हस्टोरी अर्धवट राहिली.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Entertainment, Marathi entertainment

    पुढील बातम्या