मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /उपचारासाठी गेलेल्या डॉक्टरवरच भाळलेली अभिनेत्री; तीन मुलांचा बाप असणाऱ्या व्यक्तीने घटस्फोट घेत वैजयंतीमालाशी केलेलं लग्न

उपचारासाठी गेलेल्या डॉक्टरवरच भाळलेली अभिनेत्री; तीन मुलांचा बाप असणाऱ्या व्यक्तीने घटस्फोट घेत वैजयंतीमालाशी केलेलं लग्न

विवाहित डॉक्टरच्या प्रेमात पडलेल्या वैजयंतीमाला.

विवाहित डॉक्टरच्या प्रेमात पडलेल्या वैजयंतीमाला.

Throwback Bollywood: साऊथ इंडस्ट्रीमधून बॉलिवूडमध्ये येत टॉप अभिनेत्रींच्या यादीत सामील झालेल्या पहिल्या काही अभिनेत्रींमध्ये वैजयंतीमाला यांचं नाव आवर्जून घेतलं जातं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India

मुंबई, 27 मार्च- साऊथ इंडस्ट्रीमधून बॉलिवूडमध्ये येत टॉप अभिनेत्रींच्या यादीत सामील झालेल्या पहिल्या काही अभिनेत्रींमध्ये वैजयंतीमाला यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत अनेक अभिनेत्रींनी बॉलिवूडकडे आपला मोर्चा वळवला होता. आणि या सर्व अभिनेत्रींना यशही मिळालं होतं. ज्येष्ठ दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि हेमा मालिनीसारख्या स्टार अभिनेत्रीसुद्धा त्यांच्या मोठ्या चाहत्या आहेत. त्या काळातील अनेक कलाकार त्यांच्या सौंदर्यावर फिदा होते. परंतु त्या एका डॉक्टरच्या प्रेमात पडल्या होत्या.

वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी वैजयंतीमाला यांनी, आपल्या अप्रतिम नृत्याच्या जोरावर बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या अष्टपैलू अभिनेत्रीने हिंदी चित्रपटसृष्टीत जवळपास 2 दशके काम केलं आहे.आपल्या सिने करिअरमध्ये त्यांनी 'देवदास' आणि 'संगम' सारख्या चित्रपटांमध्ये संस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत. त्याकाळात राज कपूर आणि दिलीप कुमार यांच्यासोबत वैजयंतीमाला यांच्या जोडीला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं होतं. त्यानंतर या दोन्ही विवाहित अभिनेत्यांसोबत त्यांच्या अफेअरच्या चर्चाही रंगल्या होत्या. वैजयंतीमालांनी आपल्या 'बॉन्डिंग: अ मेमोयर' या पुस्तकात दिलीप कुमार आणि राज कपूर यांच्यासोबतच्या अफेअरच्या चर्चांना निव्वळ अफवा म्हणत. या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

(हे वाचा:Raveena Tandon: 'ती'ला पतीच्या जवळ पाहून भडकलेली रविना टंडन; भर पार्टीत राडा घालत केलेलं जखमी )

वैजयंतीमाला यांच्याबाबतीत सुरु असलेल्या अफेयर्सच्या चर्चांना पूर्णविराम तेव्हा लागलं, जेव्हा त्यांच्या आयुष्यात एका डॉक्टरची एन्ट्री झाली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ते डॉक्टर राज कपूर यांच्या कुटुंबाचे फॅमिली फिजिशियनही होते. त्यांचं नाव होतं डॉक्टर चमनलाल बाली. डॉ. चमनलाल आणि वैजयंतीची लव्हस्टोरी खूपच रंजक आहे.

वैजयंती काश्मीरमधील डल सरोवरात एका चित्रपटाचं शूटिंग करत असताना, डल सरोवरातील एका दृश्याच्या चित्रीकरणादरम्यान त्या आजारी पडल्या होत्या. त्यामुळे त्यांना मुंबईत आणण्यात आलं. मुंबईत आल्यानंतर त्यांच्यावर डॉ. चमनलाल बाली यांनी उपचार केले होते. महत्वाचं म्हणजे त्यावेळी चमनलाल विवाहित होते. इतकंच नव्हे तर तीन मुलांचे वडीलही होते.

असं सांगितलं जातं की, उपचारादरम्यान वैजयंतीमाला यांची डॉ. चमनलाल बाली यांच्याशी चांगली मैत्री झाली होती. कालांतराने या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं होत. अशातच डॉक्टरांनी पत्नीला घटस्फोट देत वैजयंतीशी लग्नगाठ बांधली होती. 86 वर्षीय या अभिनेत्रीला सुचिंद्र बाली नावाचा एक मुलगा आहे. बॉलिवूडशिवाय त्यांनी तामिळ सिनेमातही काम केलं आहे. वैजयंतीच्या पतीबाबत सांगायचं झालं तर, 1986 मध्ये त्यांचे निधन झालं होतं.

First published:
top videos

    Tags: Bollywood, Bollywood actress, Entertainment