मुंबई, 24 मार्च- सध्या देशात सर्वाधिक उत्सुकता आहे ती VIVO IPL २०१९ ची. क्रिकेटच्या मराठमोळ्या चाहत्यांसाठी स्टार प्रवाहकडून एक आनंदाची बातमी आहे. VIVO IPL चे सामने प्रेक्षकांना ‘स्टार प्रवाह’वर पाहता येणार आहेत आणि तेही मराठीतून. २३ मार्चचा पहिला सामना आणि दर रविवारी VIVO IPL चे रंगतदार सामने प्रेक्षकांना मराठीतून ‘स्टार प्रवाह’वर पाहण्याची अनोखी संधी मिळणार आहे. कारण, खरी मजा तर आपल्या भाषेतच आहे. विशेष म्हणजे VIVO IPL सामन्यांच्या आधी ‘क्रिकेट नाका’ या अनोख्या कार्यक्रमातून क्रिकेट सामन्यांचा उहापोह केला जाणार आहे. अतुल परचुरे, पुष्कर श्रोत्री, विजय केंकरे, विजय पटवर्धन आणि खुशबू तावडे ही कलाकार मंडळी आपल्या खुमासदार शैलीने सामन्यांविषयीची उत्सुकता वाढवतील.
मराठी भाषा आणि क्रिकेट या दोन्ही गोष्टी चाहत्यांच्या मनाच्या जवळच्या आहेत, त्यामुळेच आता VIVO IPL २०१९ च्या निमित्ताने मराठी प्रेक्षकांना क्रिकेटचा आनंद आपल्या भाषेत घेता येणार आहे.
आरजे आशुतोष, कुणाल दाते आणि सुनील वैद्य आयपीएल सामन्यांचं मराठीतून समालोचन करणार आहेत. तर संदीप पाटील, दिलीप वेंगसरकर, चंद्रकांत पंडीत, हृषिकेश कानिटकर आणि आविष्कार साळवी ही क्रिकेटमधील तज्ज्ञ मंडळी सामन्यांची रंगत आणखी वाढवणार आहेत.
तेव्हा मराठीतून क्रिकेटचे सामने पाहण्याची ही दुर्मिळ संधी चुकवू नका. दर रविवारी VIVO IPL सायंकाळी सात वाजल्यापासून फक्त स्टार प्रवाहवर, कारण खरी मजा तर आपल्या भाषेतच आहे.
VIDEO: महिलेची छेड काढणाऱ्या साधूला नागरिकांनी फलाटावरच दिला प्रसाद
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा