मुंबई, 27 डिसेंबर : मुंबई ही मायानगरी आहे. इथे सगळ्या जगातून लोक सिनेसृष्टीत काम करण्यासाठी येतात आणि प्रचंड संघर्ष करतात. अनेकजण संघर्षाला तोंड देत यशस्वी होतात. ते यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचतात. त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळते. ते सेलिब्रिटी बनतात. याच सेलिब्रिटींच्या आयुष्यातल्या (Celebrity Life) घटना, त्यांची अफेअर्स, डेटिंग हे सगळं रसिक प्रेक्षक अगदी मनोभावे फॉलो करतात. या सगळ्यांची माहिती देणाऱ्या अनेक वेबसाईट्सही आता आहेत. टीव्ही इंडस्ट्रीतलं चर्चित जोडपं व्हिव्हियन डिसेना आणि वहबिझ दोराबजी यांच्याबद्दलही (actors Vivian Dsena and Vahbiz Dorabjee divorce) लोकांना माहिती हवी असते. या दोघांनी 2017 मध्ये घटस्फोट घेतला होता. पण त्याचं कारण आता डिसेनाने उघड केलं आहे. याबाबतचं वृत्त ‘पिंकव्हिला’ या वेबसाइटने दिलं आहे.
'टाइम्स ऑफ इंडिया'च्या हवाल्याने दिलेल्या या वृत्तात म्हटलंय की, डिसेना-दोराबजी या जोडप्याने 2017 मध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला होता. चार वर्षांनी त्यांनी सामोपचाराने घटस्फोट घ्यायचा निर्णय घेतला. ‘प्यार की ये एक कहानी’ (Pyaar Kii Ye Ek Kahaani) या टीव्ही मालिकेच्या शूटिंगच्या काळात हे दोघे प्रेमात पडले आणि त्यांनी 2013 मध्ये लग्न केलं होतं. काही वर्षांनी दोघांमध्ये मतभेद झाल्यानंतर 2017 मध्ये त्यांनी घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज केला होता. गेली चार वर्षं ही सुनावणी चालली. त्यानंतर या दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट (Divorce) घेऊन आपापलं आयुष्य पुढे नेण्याचं ठरवलं.
हेही वाचा : सनी लिओनीच्या अटकेची का होतेय मागणी; काय आहे प्रकरण?
या जोडप्याने एकत्रितपणे एक पत्रक काढलं असून, "अतिशय खेदाने आम्ही हे जाहीर करत आहोत की आम्ही कायदेशीररित्या विभक्त झालो आहोत आणि आम्ही आता घटस्फोट घेतला आहे. गेल्या काही वर्षांपासून घटस्फोट होऊ नये यासाठी प्रयत्न केले. पण शेवटी आम्ही वेगळं आयुष्य जगणंच हिताच ठरेल, असं आम्हाला वाटलं. हा निर्णय आम्ही परस्परसंमतीने (Mutually) घेतला आहे. त्यामुळे कोणाच्या चुकीमुळे हे झालं किंवा हे घडायला कोण कारणीभूत ठरलं यावर आता चर्चा सुरू करणं योग्य नाही. कुणालाही दोषी ठरवणं योग्य नाही. आम्ही आमच्या फॅन्सना (Fans) आवाहन करतो की, त्यांनी हे सर्व समजून घ्यावं. आम्ही आमच्या खासगी आयुष्यातील गोष्टी उघड करू इच्छित नाही. आमच्या चाहत्यांच्या प्रेम आणि पाठिंब्याच्या बळावर आम्ही आमचं काम पुन्हा आधीसारखंच करू शकू अशी अपेक्षा आहे. गेल्या अनेकवर्षांपासून आमच्यावर चाहत्यांनी केलेल्या प्रेमाच्या वर्षावाची परतफेड आम्ही आगामी काळात काही चांगल्या प्रोजेक्ट्सच्या (New projects) माध्यमातून करण्याचा प्रयत्न करू. भूतकाळात आमच्या चाहत्यांनी फॅन्सनी आमच्यावर जितकं प्रेम केलं तितकंच ते पुढेही करतील अशी आशा बाळगतो."
हेही वाचा : चालता चालताच मलायकाचा ढासळला तोल; Video Viral होताच झाली ट्रोल
दरम्यान, डिसेनाने ईटाइम्स टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की, "माझं आणि वाहबिझचं नातं पूर्णत्वाला पोहोचलं आहे. त्यामुळे आम्ही आमच्या आयुष्यातला हा अध्याय इथंच बंद करणं आमच्यासाठी योग्य वाटलं. प्रत्येक शेवटानंतर एक नवी सुरूवात होते. त्यामुळे आम्हा दोघांबाबतही तसंच घडेल. आम्हा दोघांनाही शांतता आणि समृद्धी लाभावी."
वाहबिझही म्हणाली, "मी आणि व्हिव्हियनने परस्परसंमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. आता आमच्या आयुष्यातील तो अध्याय (Chapter is Closed) संपला आहे. आनंद आणि शांततेने भरलेली एक नवी सुरुवात आमची वाट पाहत आहे. मी व्हिव्हियनलाही शुभेच्छा देते."
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.