Home /News /entertainment /

HBD: फक्त 400 रुपये घेऊन गाठली होती मुंबई! आज कोट्यवधींचे मालक आहेत सुरेश ओबेरॉय

HBD: फक्त 400 रुपये घेऊन गाठली होती मुंबई! आज कोट्यवधींचे मालक आहेत सुरेश ओबेरॉय

ज्येष्ठ चरित्र अभिनेते सुरेश ओबेरॉय यांचा आज (17 डिसेंबर 21) 75 वा वाढदिवस आहे. त्यांच्या आयुष्याचा प्रवास प्रचंड प्रेरणादायी आहे.

     मुंबई, 17 डिसेंबर-   प्रसिद्ध अभिनेते सुरेश ओबेरॉय   (Suresh Oberoi)  यांचा आज (17 डिसेंबर 21) 75वा वाढदिवस आहे. सध्या ते लाईमलाईटपासून अगदीच दूर असले, तरी 80-90च्या दशकात त्यांचा स्वतःचा असा एक चाहता वर्ग होता. चरित्र अभिनेता  (Character actor)  म्हणून त्यांनी भरपूर प्रसिद्धी मिळवली आहे. एवढंच नाही, तर 1987 सालचा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कारही  (National award for best supporting role)   त्यांनी मिळवला आहे. दमदार आवाजाची देणगी मिळालेला हा अभिनेता कित्येक सीन्समध्ये हीरोच्याही वरचढ अभिनय करुन जायचा. त्यांच्या वाढदिवसानिमित्त   (Suresh Oberoi birthday)  त्यांच्याबाबत काही खास गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ओबेरॉय यांचा जन्म सध्या पाकिस्तानात असलेल्या क्वेटा (Quetta) भागात झाला होता. फाळणीच्या वेळी त्यांचे कुटुंब भारतातल्या हैदराबादमध्ये स्थलांतरित झाले. लहानपणापासूनच अभिनयाची आवड असलेल्या सुरेश यांनी खिशात केवळ 400 रुपये घेऊन मुंबई गाठली होती. पण आपले अभिनय कौशल्य आणि मेहनतीच्या बळावर आज त्यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती (Suresh Oberoi property) आहे. एका सेलिब्रिटी वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, ओबेरॉय यांची नेट वर्थ (Suresh Oberoi net worth) ही 8 मिलियन डॉलर्स; म्हणजेच सुमारे 61 कोटी रुपये एवढी आहे. एवढंच नाही, तर त्यांना लक्झरियस गाड्यांचीही आवड आहे. त्यांच्या ताफ्यामध्ये मर्सिडीज, रेंज रोव्हर यांसारख्या 5 आलिशान गाड्यांचा (Suresh Oberoi cars) समावेश आहे. रेडिओपासून केली करिअरची सुरूवात- सुरेश यांचा भारदस्त आवाज ही त्यांची जमेची बाजू होती. या आवाजामुळेच त्यांना रेडिओमध्ये संधी मिळाली. दमदार आवाजासोबत ते दिसायलाही राजबिंडे होते. त्यामुळे त्यांना मॉडेलिंग क्षेत्रातही चांगल्या संधी मिळू लागल्या. यानंतर पुढे त्यांनी चित्रपटांमध्ये अभिनय करण्यास सुरुवात केली. अभिनेता म्हणून त्यांचा पहिला चित्रपट (Suresh Oberoi first film) हा ‘जीवन मुक्त’ होता. तर 1980च्या ‘एक बार फिर’ या चित्रपटात त्यांना पहिल्यांदा मुख्य अभिनेत्याची भूमिका मिळाली. (हे वाचा:विकी कौशलमुळं सारा अली खाननं स्वतः ला म्हटलं नशीबवान! काय आहे कारण?) मुख्य अभिनेत्याच्या रुपात त्यांची कारकीर्द तेवढी यशस्वी नाही ठरली. मात्र, आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी कित्येक सपोर्टिंग रोल अजरामर करून ठेवले. ‘लावारिस’, ‘मिर्च मसाला’, ‘ऐतबार’, ‘कर्तव्य’, ‘सुरक्षा’, ‘खंजर’ अशा कित्येक चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका (Suresh Oberoi films) आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहेत. सुरेश यांना केवळ हिंदीच नाही, तर इंग्रजी, पंजाबी, तेलुगु आणि तमिळ अशा इतर भाषाही येतात. 1974 साली सुरेश यांचे यशोधरा ओबेरॉय यांच्यासोबत लग्न झाले. त्यांचा मुलगा विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) हादेखील बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्यांना एक मुलगीही आहे, जिचं नाव मेघना ओबेरॉय (Meghana Oberoi) आहे. सध्या बॉलिवूडच्या झगमगाटापासून दूर राहणारे सुरेश हे ब्रह्मकुमारी यांचे फॉलोअर आहेत. त्यांच्या इन्स्टाग्रामवरदेखील केवळ यासंबंधित फोटो आणि व्हिडिओज शेअर केले जातात.अवघे 400 रुपये गाठीशी असताना मुंबई गाठून, आज कोट्यवधींची संपत्ती उभी केलेल्या सुरेश यांची सक्सेस स्टोरी (Suresh Oberoi success story) ही नक्कीच प्रेरणादायी आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा!
    First published:

    Tags: Bollywood actor, Entertainment

    पुढील बातम्या