'उरी'नंतर आता बालाकोटवर होणार सिनेमाची निर्मिती, 'हा' अभिनेता दिसणार मुख्य भूमिकेत

2019 च्या सुरुवातीला ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ हा सिनेमा आला आणि तो बॉक्स ऑफिसवर तुफान चालला.

2019 च्या सुरुवातीला ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ हा सिनेमा आला आणि तो बॉक्स ऑफिसवर तुफान चालला.

  • Share this:
मुंबई, 23 ऑगस्ट : मागच्या काही काळापसून देशात अशा काही घटना घडत आहे. ज्यामुळे भारताचा शेजारी पाकिस्तानला धडकी भरली आहे. मात्र याची सुरुवात झाली होती ती 2016 मध्ये भारताकडून पाकिस्तानवर करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राइकपासून. या घटनेवर 2019 च्या सुरुवातीला ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ हा सिनेमा आला आणि तो बॉक्स ऑफिसवर तुफान चालला. त्यानंतर आता बालाकोट एअर स्ट्राइकवरही सिनेमा बनवण्याची तयारी बॉलिवूडमध्ये सुरू झाली आहे. लवकरच या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. भारतातील पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायूदलानं पाकिस्तानच्या बालाकोट येथे एअर स्ट्राइक करत दहशतवादी तळ उध्वस्त केले. या घटनेत भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान पाकिस्तानात कैद झाले आणि त्यानंतर त्यांची सुखरुप सुटका सुद्धा झाली. ही संपूर्ण घटना आता सिनेमाच्या रुपातून प्रेक्षकांसमोर मांडण्यात येणार आहे. या सिनेमाची कास्ट फायनल झाली असून अभिनेता विवेक ऑबेरॉय या सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. नरेंद्र मोदींच्या बायोपिकनंतर विवेकनं या सिनेमाची तयारी सुरू केली आहे. वाचा : बॉलिवूड पदार्पणाआधी हॉटेलमध्ये काम करायची 'ही' अभिनेत्री या सिनेमातून पाकिस्तानचं सत्य आणि भारताचे रिअल हिरो अभिनंदन वर्तमान आणि मिंटी अग्रवाल यांची कहाणी दाखवण्यात येणार आहे. या सिनेमाचं शूटिंग जम्मू काश्मीर, दिल्ली आणि आग्रा या ठिकाणी होऊ शकतं. हा सिनेमा या वर्षाच्या अखेर पर्यंत प्रेक्षाकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. मात्र सिनेमाचं नाव अद्याप गुलदस्त्यात आहे. हा सिनेमा हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेत रिलीज होणार असल्याच्या चर्चा आहेत. वाचा : नशीबाचा खेळ! स्टेशनवर गाणाऱ्या रानूनं हिमेश रेशमियासोबत रेकॉर्ड केलं पहिलं गाणं विवेक ऑबेरॉयचा ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा सिनेमा अपेक्षेप्रमाणं कमाई करु शकला नव्हता. सुरुवातीला या सिनेमाची खूप चर्चाही झाली होती मात्र लोकसभा निवडणुकांमळे या सिनेमाची रिलीज डेट वारंवार बदलण्यात आली. अखेर हा सिनेमा 25 मे ला रिलीज झाला होता मात्र प्रेक्षकाच्या अपेक्षा पूर्ण करण्यात विवेक ऑबेरॉय पूर्णपणे अयशस्वी ठरला. त्यामुळे या सिनेमातून विवेक प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करणार का याची सर्वांना उत्सुकता आहे. वाचा : प्रदर्शनाआधीच Saaho नं उडवली प्रभासची झोप, वाचा काय आहे नेमकं कारण ========================================================================== 300 फूट खोल सप्तकुंड धबधब्यात पडला पर्यटक; रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक VIDEO
Published by:Megha Jethe
First published: