वर्ल्ड कप पराभवानंतर टीम इंडियाची थट्टा, विवेक ओबेरॉय चाहत्यांच्या टार्गेटवर

विवेकनं त्याच्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामुळे त्याला ट्रोल केलं जात आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 13, 2019 12:39 PM IST

वर्ल्ड कप पराभवानंतर टीम इंडियाची थट्टा, विवेक ओबेरॉय चाहत्यांच्या टार्गेटवर

मुंबई, 13 जुलै : ICC Cricket World Cup 2019मध्ये भारताचं आव्हान सेमी फायनलमध्येच संपुष्टात आलं. यानंतर अनेकांनी सोशल मीडियच्या माध्यमातून आपली नाराजी जाहीर केली. काहींनी टीम इंडिया पराभवानंतरही पाठिंबा दिला तर काहींनी या पराभवाला कर्णधार विराट कोहलीला जबाबदार मानत आहेत. याशिवाय टीम इंडियाच्या पराभवावर अनेक मीम्स सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले. असाच एक मीम अभिनेता विवेक ओबेरॉयनं त्याच्या ट्विटरवर शेअर केला. ज्यामुळे आता विवेकला सोशल मीडियावर टीकेला सामोरं जावं लागत आहे.

विवेकनं त्याच्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यात एक माणूस हात पसरून समोरून येत असलेल्या एका महिलेला मीठी मारण्याचा प्रयत्न करतो. मात्र नंतर त्याला समजतं की ती महिला त्याच्या मागून येत असलेल्या एका माणसाला पाहून असं करत आहे. त्यानंतर तो माणूस पुढे निघून जातो. हा व्हिडिओ शेअर करताना विवेकनं त्याला, ‘वर्ल्डकप सेमी फायनलमध्ये भारतीय चाहत्यांसोबत काहीसं असंच झालं. #CWC19 #WorldCupSemiFinal #INDvsNZ #indiavsNewzealand’ असं कॅप्शन दिलं आहे.

कानातून रक्त येत असतानाही ऐश्वर्यानं डान्स न थांबवता पूर्ण केलं शूटिंग!

विवेकच्या या ट्वीटनंतर एका युजरनं लिहिलं कमीत कमी ते देशासाठी खेळले आणि सेमी फायनल पर्यंत पोहोचले. तुझ्यासारखं फ्लॉप सिनेमा घेऊन बाजारात नाही येत. भारतीय टीमसाठी काहीतरी अभिमान ठेव असा सल्ला युजर्सनी विवेकला दिला. या पाठोपाठ अनेक युजर्सनी विवेकवर नकारात्मक प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. तर काहींनी त्याच्या खाजगी आयुष्यावरही टिका करायला सुरुवात केली.

Bigg Boss Marathi 2- या रविवारी शिवानी सुर्वे करणार कमबॅक?

विवेक याअगोदर ऐश्वर्या रॉयचा मीम्स शेअर केल्यानंतर अशाचप्रकारे ट्रोल झाला होता. काही दिवसांपूर्वी आलेला सिनमा ‘पीएम नरेंद्र मोदी’मुळे विवेक खूप चर्चेत आला होता. या सिनेमाच्या रिलिजवून बराच गोंधळ उडाला होता. अनेक वाद विवादांनंतर हा सिनेमा लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर रिलीज झाला होता.

Chicken Curry Law Trailer : आपल्या देशात निर्दोषत्व सिद्ध करणं किती अवघड?

=================================================

शेतकरी म्हणाले हवामान खात्यापेक्षा आमचा भोलानाथच बरा! पाहा SPECIAL REPORT

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 13, 2019 12:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...