मी काही भाजपभक्त नाही, पाचवेळा मिळालेलं तिकीट नाकारलं- विवेक ओबेरॉय

मी काही भाजपभक्त नाही, पाचवेळा मिळालेलं तिकीट नाकारलं- विवेक ओबेरॉय

'पीएम नरेंद्र मोदी' बायोपिक बनवल्यापासून विवेक ओबेरॉयचे भाजपशी चांगले संबंध असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत.

  • Share this:

मुंबई, 19 एप्रिल: बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय 'पीएम नरेंद्र मोदी' बायोपिकमुळे सध्या खूप चर्चेत आहे. गुरुवारी (18 एप्रिल) निवडणूक आयोगानं सुद्धा हा सिनेमा पाहिला. पण हा बायोपिक बनवल्यापासून विवेक ओबेरॉयचे भाजपशी चांगले संबंध असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. मात्र नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विवेकनं या सर्व चर्चांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावर बोलताना विवेक म्हणाला, मी अनेकदा सांगितलं आहे की, मी किंवा माझा सिनेमा भाजपशी संबंधीत नाही.

विवेक ओबेरॉय पुढे म्हणाला, 'पीएम नरेंद्र मोदी' या बायोपिकसाठी कोणीही कोणत्याही प्रकारची मदत केलेली नाही. आम्ही अनेकदा हे स्पष्ट केलं आहे की, या सिनेमासाठी आमचा कोणताही राजकीय अजेंडा नाही. जर असं असतं तर मी भाजप कडून आलेल्या निवडणूक लढविण्याच्या ऑफर नाकारल्या नसत्या. 5 वेळा मला ही संधी मिळाली पण मी ती कधीच स्वीकारली नाही. कारण मी एक कलाकार आहे आणि राजकारण हे माझं काम नाही.'

विवेकनं यावेळी सिनेमाच्या रिलीजला होणाऱ्या विलंबाबाबत नाराजी दर्शवली. तो म्हणाला, सिनेमाच्या रिलीजला उशीर होत असल्यानं सिनेमाची संपूर्ण दुःखी आणि निराश आहे. या सिनेमाकडून सर्वांनाच खूप अपेक्षा आहेत. संपूर्ण चित्रीकरणाला जवळपास दीड वर्ष लागलं आणि आम्ही या सिनेमासाठी खूप उत्साहित होतो. पण रिलीजच्या एक दिवस अगोदरच सिनेमावर बंदी घालण्यात आली. त्यामुळे सर्वांनाच वाईट वाटत आहे. जर हा सिनेमा मतदारांवर परिणाम करु शकतो तर मग जाहिराती, राजकीय नेत्यांची भाषणं या गोष्टीसुद्धा मतदारांवर परिणाम करतात.

'पीएम नरेंद्र मोदी'वर निवडणूक आयोगानं बंदी आणल्यावर ट्रेलर युट्यूबवरून काढून टाकण्यात आला आहे. मात्र निवडणूक आयोग लवकरच या सिनेमाच्या रिलीजला परवानगी देतील असा विश्वास विवेक ओबेरॉयला वाटतो. याविषयी प्रसारमाध्यमांशी बोलताना विवेक म्हणाला,'मी निवडणूक आयोगाची प्रतिक्रिया कोणाशीही शेअर करू शकत नाही. पण मी त्यांच्या उत्तरामुळे खूप खूश आहे.' या सिनेमाचं दिग्दर्शन ओमंग कुमारनं केलं असून संदीप सिंह, सुरेश ओबेरॉय आणि आनंद पंडित यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.

First published: April 19, 2019, 3:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading