मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Amrita Rao: शाहिद सोबत रोमान्स करत कमावलं नाव; आता अभिनय सोडून अमृता राव करते 'हे' काम

Amrita Rao: शाहिद सोबत रोमान्स करत कमावलं नाव; आता अभिनय सोडून अमृता राव करते 'हे' काम

अमृता राव

अमृता राव

'विवाह' या चित्रपटामधून अमृताला विशेष लोकप्रियता मिळाली. तिने साकारलेली पूनम आजही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे. त्याच बरोबर तिने 'मैं हूं ना', 'इश्क-विश्क'या चित्रपटातून देखील चांगलंच नाव कमावलं. पण त्यानंतर ती सिनेजगतापासून दूर गेली. आता अमृता राव नेमकं काय काम करते जाणून घ्या.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 02 एप्रिल : बॉलीवूड अभिनेत्री अमृता रावने आज अभिनय सोडला असला तरी तिच्या काही भूमिका प्रेक्षकांच्या मनावर कायम कोरल्या गेल्या आहेत. खरं तर अमृताने 'अब के बरस' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.  या चित्रपटासाठी अमृताला सर्वोत्कृष्ट पदार्पणासाठी फिल्मफेअरचे नामांकनही मिळाले होते. पण  'विवाह' या चित्रपटामधून अमृताला विशेष लोकप्रियता मिळाली. तिने साकारलेली पूनम आजही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे. त्याच बरोबर तिने  'मैं हूं ना', 'इश्क-विश्क'या चित्रपटातून देखील चांगलंच नाव कमावलं. पण त्यानंतर ती सिनेजगतापासून दूर गेली. आता अमृता राव नेमकं काय काम करते जाणून घ्या.

2014 मध्ये अमृता रावने रेडिओ जॉकी आरजे अनमोलसोबत लग्न केले. अमृता रावने भलेही स्वत:ला चित्रपटांपासून दूर केले असेल पण सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नेहमीच तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते. सोशल मीडियाद्वारे ती तिच्या आयुष्यातील घडामोडी चाहत्यांसोबत शेअर करत असते. आजही तिचं जबरदस्त फॅन फॉलोईंग आहे.

Salman Khan: 90 च्या दशकातील 'या' टॉप अभिनेत्रीने सलमान खान बद्दल केला मोठा खुलासा; म्हणाली 'तो रात्री सेटवर...'

अमृता सध्या चित्रपटात काम करत नसली तरी तिचं एक यूट्यूब चॅनल आहे. ज्याद्वारे ती चाहत्यांच्या भेटीस येत असते. तिच्या यूट्यूब चॅनलवर अनेकदा रिलेशनशिपचे व्हिडिओ अपलोड करत असते तसेच आयुष्यातील अनेक रंजक किस्से चाहत्यांसोबत शेअर करत असते.

2020 मध्ये अमृता रावने मुलगा वीरला जन्म दिला. वीरच्या जन्मानंतर अमृताने पती अनमोलसोबत युट्यूब चॅनल उघडले आहे. या यूट्यूब चॅनलवर अमृता सतत परस्पर संबंध आणि मातृत्वाशी संबंधित व्हिडिओ अपलोड करत असते. याच्या पुढे एक पाऊल टाकत अमृताने आता एक पुस्तक देखील लिहिले आहे. यासगळ्यात तिला तिचा पती अनमोलची मोलाची साथ लाभली आहे.

अमृता रावने पती पत्नीच्या नात्यातील गोडवा कसा टिकवावा यावर पुस्तक लिहिले आहे. पण या कामात ती एकटी नाही. या कामात तिचा पती आरजे अनमोलची तिला साथ लाभली आहे. अमृताच्या पहिल्या पुस्तकाचे नाव 'कपल ऑफ थिंग्स' असे ठेवण्यात आले आहे. प्रेमळ जोडपे असण्यापासून ते पती-पत्नी बनण्यापर्यंतचा प्रवास आणि नंतर आई-वडील होण्यापर्यंतचा प्रवास अमृताने या पुस्तकात लिहिला आहे. इतकंच नाही तर अमृताने  या पुस्तकात  तिच्या आणि अनमोलच्या नात्यातील काही गोड आणि कटू अनुभव देखील शेअर केले आहेत. अमृता-अनमोलने त्यांचं हे पुस्तक बॉलिवूडचं लोकप्रिय कपल दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगला देखील दिलं आहे. त्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अमृताच्या या पुस्तकाला वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

First published:
top videos

    Tags: Bollywood, Bollywood actress, Bollywood News, Entertainment