Home /News /entertainment /

जेव्हा ऐश्वर्या रायने एक-दोन नव्हे तर 30 लोकांना वाढले होते जेवण; विशाल ददलानी सांगितला किस्सा

जेव्हा ऐश्वर्या रायने एक-दोन नव्हे तर 30 लोकांना वाढले होते जेवण; विशाल ददलानी सांगितला किस्सा

एकदा ऐश्वर्याने एक-दोन नव्हे तर 30 लोकांना जेवण वाढले होते. 'सा रे ग म पा' या रिअॅलिटी शोच्या स्पेशल एपिसोडमध्ये विशाल ददलानीने याबद्दल सांगितलं आहे.

  मुंबई, 28 नोव्हेंबर - बॉलीवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक असलेली ऐश्वर्या राय- बच्चनला (Aishwarya Rai) बुद्धी आणि सौंदर्याचं उत्तम उदाहरण मानले जाते. ती जेवढी सुंदर आहे तितकीची ती साधी देखील आहे. आता संगीतकार आणि गायक विशाल ददलानीने (Vishal Dadlani) देखील याचा पुरावा दिला आहे. विशालने खुलासा केला आहे की, एकदा ऐश्वर्याने एक-दोन नव्हे तर 30 लोकांना जेवण वाढले होते. 'सा रे ग म पा' या रिअॅलिटी शोच्या स्पेशल एपिसोडमध्ये त्याने याबद्दल सांगितलं आहे. विशालने सांगितला किस्सा नुकताच अभिनेता अभिषेक बच्चन त्याच्या आगामी चित्रपट 'बॉब बिस्वास'च्या प्रमोशनच्या निमित्ताने 'सारेगमपा' या रिअॅलिटी शोमध्ये आला होता. त्याच्यासोबत अभिनेत्री चित्रांगदा सिंगही होती. दरम्यान, शोचा होस्ट आदित्य नारायणने अभिषेक बच्चनला प्रश्न विचारला की, ऐश्वर्या राय घरी काम करते का? अभिषेक काही बोलण्याआधीच विशाल ददलानी यांनी खुलासा केला की, “मी ऐश्वर्या आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत टूरला गेलो होतो. त्या टूरमध्ये जवळपास 30 लोक होते. एके दिवशी संपूर्ण टीमने अमिताभ बच्चन यांच्यासोबत जेवण करण्याची इच्छा व्यक्त केली. सर्वजण जेवत असताना त्याचवेळी एक ग्रुप जेवायला तिथे पोहोचला. त्याचवेळी, वेटर एकाच वेळी इतक्या लोकांना सेवा देऊ शकत नव्हते. मग काय ऐश्वर्याने आम्हा सर्वांना जेवण वाढण्यास सुरूवात केली. वाचा:जाह्नवी कपूरचे मेकअप आर्टिस्टसोबत जोराचे भांडण; अर्जुन कपूरची अशी होती प्रतिक्रिया ऐश्वर्याने प्रेमाने सर्वांना वाढले होते जेवण यासोबतच विशाल ददलानीने असेही सांगितले की, 'आमच्याकडे अशा कार्यक्रमांमध्ये बरेच लोक असतात, जे जेवण वाढायला मदत करतात. पण ऐश्वर्याने हक्काने सांगितले की मीच जेवण सर्व्ह करणार आहे. ऐश्वर्या रायने हे सर्व प्रेमाने केले होते.
  View this post on Instagram

  A post shared by VISHAL (@vishaldadlani)

  अभिषेक बच्चननेही केले अॅशचे कौतुक विशाल पुढे म्हणाला की, 'आम्ही ऐश्वर्याला अनेक वर्षांपासून ओळखतो, ती अशीच प्रेमळ आहे. त्यादिवशी मलाही आश्चर्य वाटले कारण जेव्हा सर्वांनी जेवण केले. तेव्हा तिनं सर्वांना मिठाई दिली आणि शेवटी स्वतः जेवण केले.' विशाल ददलानी हसला आणि म्हणाले की, तो दिवस आम्ही कधीही विसरू शकत नाही कारण ऐश्वर्या राय बच्चनने आम्हाला जेवण वाढले होते. वाचा:आलिया भट्टने 'RRR' मध्ये 15 मिनिटांचा रोल करण्यासाठी घेतले इतके कोटी विशालने आपले बोलणे संपवल्यावर अभिषेक बच्चन पत्नी ऐश्वर्या राय बच्चनबद्दल म्हणाला की, 'ती सर्वोत्कृष्ट आहे. ऐश्वर्याला भारतीय संस्कृती याबद्दल चांगली माहिती आहे. ती आपल्या मुलीलाही हे सर्व शिकवत आहे. ती जमिनीशी जोडलेली आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Aishwarya rai, Bollywood actor, Bollywood News, Entertainment

  पुढील बातम्या