कधी दिवसाला 40 सिगरेट ओढायचा, आज आहे बॉलिवूडचा प्रसिद्ध प्लेबॅक सिंगर

कधी दिवसाला 40 सिगरेट ओढायचा, आज आहे बॉलिवूडचा प्रसिद्ध प्लेबॅक सिंगर

एक वेळ होती जेव्हा हा सिंगर दिवसाला 40 सिगरेट ओढत असे ज्यामुळे त्याचं करिअर संपण्याची वेळ आली होती.

  • Share this:

मुंबई, 20 फेब्रुवारी : सिगरेट ओढणं आरोग्यासाठी घातक आहे. अशी सुचना आपल्याला कोणताही सिनेमा पाहण्याआधी दाखवली जाते. इतकंच नाही तर सिगरेटच्या पॅकेटवरही ही सुचना लिहिलेली असते. पण याकडे दुर्लक्ष करुन अनेकजण सिगरेट ओढतातच. पण असं केल्यानं आपल्या शरीराची काय अवस्था होते याचा अनुभव बॉलिवूडच्या एक प्रसिद्ध गायकानं केला आहे. एक वेळ होती जेव्हा हा सिंगर दिवसाला 40 सिगरेट ओढत असे ज्यामुळे त्याचं करिअर संपण्याची वेळ आली होती.

बॉलिवूडचा प्रसिद्ध प्लेबॅक सिंगर विशाल ददलानी सध्या इंडियन आयडॉल 11 मध्ये परीक्षक म्हणून काम पाहत आहे. त्यानं नुकताच त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात त्यानं तो एकेकाळी दिवसाला 40 सिगरेट ओढत होता असा खुलासा केला आहे. विशालनं त्याच्या या व्हिडीओसोबत एक मोठी पोस्ट सुद्धा लिहिली आहे.

ज्याला करायचं होतं डेट, त्याची झाली भेट! रिंकू राजगुरूनं शेअर केला PHOTO

विशालनं लिहिलं, '2019 च्या ऑगस्टमध्ये मी सिगरेट ओढणं पूर्णपणे बंद केलं. 9 वर्षं दिवसाला 40 पेक्षा जास्त सिगरेट एक वर्ष वेपिंग (इलेक्ट्रॉनिक सिगरेट)आणि अशाच अवस्थेत कॉन्सर्ट, रेकॉर्डिंग यामध्ये मी माझ्या गळ्याला खूप वाईट प्रकारे नुकसान पोहोचवलं होतं. त्यामुळे माझ्या गळ्यातून आवाज निघणं अवघड झालं होतं. पण कोणालाच याबाबत सांगितलं नाही. मी संघर्ष करत राहिलो. माझी रेंज, कंट्रोल, टोन सर्वच बदललं होतं. खालच्या स्वरात गाणं मला अशक्य झालं होतं. ज्यात सर्वात जास्त मेहनत लागते.'

अजय देवगणच्या ‘तान्हाजी’चा जागतिक स्तरावर नवा विक्रम, केली इतक्या कोटींची कमाई

View this post on Instagram

I quit smoking on the last day of August 2019. After 9 straight years of 40 cigarettes a day, and a year of vaping (which was worse!) plus my severe abuse of my vocals at concerts and during recordings...my voice had almost given up. I never let anyone know, but I was struggling. My range, control, tone, everything was wobbling. Singing softly was completely impossible (any singer will agree, that's far more demanding than belting out a loud take!) Everything you've heard from me in the last 2 years, has been nowhere close to 100% of what I actually sound like. BUT...NOW... Almost six months after quitting completely, my voice is almost back to what it used to be. My clean tone has returned, my control is a lot better (not yet perfect, though) and I'm actually happy to be singing again, instead of feeling discomfort and pain. Basically...what I'm saying is...if you smoke...quit now.before you damage yourself permanently.

A post shared by VISHAL (@vishaldadlani) on

विशालनं पुढे लिहिलं, 'मागच्या दोन वर्षांत तुम्ही माझ्याकडून जे ऐकलं त्यात कुठेच माझं 100% योगदान नाही. पण मागच्या 6 महिन्यांपासून मी स्मोकिंग सोडल्यानंतर माझा आवाज आता पूर्वपदावर येत आहे. माझा क्लिअर टोन पुन्हा मिळाला आहे. कंट्रोल पहिल्यापेक्षा चांगला झाला आहे. ज्यामुळे आता मी पुन्हा गाऊ शकतो. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की जर तुम्ही सिगरेट ओढत असाल तर कृपया लवकरात लवकर थांबवा.'

‘उद्या माझे ड्रायव्हर-मेकअपमन पण अवॉर्ड देतील’ सलमाननं सांगितलं बॉलिवूडचं सत्य

यासोबतच विशालनं त्याच्या सुरेल आवाजत किन्ना सोणा हे गाणं गायलं आहे. याचा व्हिडीओ त्यानं त्याच्या या पोस्टसोबत शेअर केला आहे. त्याच्या या व्हिडीओ आणि पोस्टचं अनेकजण कौतुक करताना दिसत आहेत. त्याच्या चाहत्यांनी त्याची ही पोस्ट त्यांच्यासाठी प्रेरणा असल्याचं म्हटलं आहे.

First published: February 20, 2020, 2:41 PM IST

ताज्या बातम्या