S M L

'भारत' सोडल्यानंतर बाॅलिवूडच्या एका मोठ्या दिग्दर्शकासोबत प्रियांका चोप्रा करतेय सिनेमा

प्रियांकाचा जवळचा मित्र दिग्दर्शक विशाल भारद्वाजनं एक धक्कादायक बातमी दिलीय. एका इव्हेंटमध्ये त्यानं पत्रकारांशी संवाद साधला.

Updated On: Aug 30, 2018 03:30 PM IST

'भारत' सोडल्यानंतर बाॅलिवूडच्या एका मोठ्या दिग्दर्शकासोबत प्रियांका चोप्रा करतेय सिनेमा

शिखा धारिवाल, मुंबई, 30 आॅगस्ट : बाॅलिवूड देशी गर्ल प्रियांका चोप्राला हाॅलिवूड आणि निकपुढे काहीही दिसत नाहीय. खरं तर प्रियांकाला तिची ओळख मिळाली ती बाॅलिवूडमुळे. बाॅलिवूडमुळेच तिला हाॅलिवूडच्या आॅफर्स आल्या. पण आता बाॅलिवूडच्या सिनेमांना ती नकार देत सुटलीय. नुकतीच तिनं 'भारत'कडे पाठ फिरवली आणि चर्चेत आली. सलमान म्हणाला, 'आम्ही ऐकलंय, प्रियांका मोठा सिनेमा करायला जातेय. चांगलं आहे. आधी सांगितलं असतं तर आम्हीच तिला मोकळं केलं असतं.' अर्थात, सलमान खान आणि त्याचे वडीलही प्रियांकावर नाराजच झाले.

प्रियांकाचा साखरपुडाही जोरदार झाला. आता ती सिनेमात कमीच दिसेल असं वाटत असताना नुकतंच प्रियांकाचा जवळचा मित्र दिग्दर्शक विशाल भारद्वाजनं एक धक्कादायक बातमी दिलीय. एका इव्हेंटमध्ये त्यानं पत्रकारांशी संवाद साधला.

विशाल भारद्वाजनं सांगितलं, 'मला प्रियांकाबरोबर काम करण्याची इच्छा होती. तिलाही माझ्याबरोबर काम करायचं होतं. प्रियांका माझ्याबरोबर पुढच्या वर्षी एक सिनेमा करेल. मी या प्रोजेक्टवर एक वर्ष काम करतोय. प्रियांकाला समोर ठेवूनच मी स्क्रीप्ट लिहिलंय.'

प्रियांका चोप्रानं विशाल भारद्वाजसोबत कमिने, सात खून माफ हे सिनेमे केलेत. त्यामुळे आता तिच्या नव्या सिनेमाबद्दल खूप उत्सुकता आहे.

प्रियांका चोप्रा आणखी एका हॉलिवूडपटात झळकणार आहे. क्रिस पॅटसोबत 'काऊबॉय निंजा वायकिंग' या सिनेमात प्रियांका काम करणार आहे असं हॉलिवूड रिपोर्टरच्या वृत्तानुसार स्पष्ट झालंय. ब्रेकिंग बॅड आणि गेम ऑफ थ्रोन्सच्या दिग्दर्शिका मिशेल मॅकलॅरन हा सिनेमा दिग्दर्शित करणार आहेत. हा हॉलिवूडचा बिग बजेट सिनेमा असेल आणि 2019 च्या जूनमध्ये प्रदर्शित होईल असं बोललं जातंय.

Loading...
Loading...

PHOTOS : बोल्ड अवतारात श्रद्धा कपूर पोचली 'स्त्री'च्या प्रमोशनला!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 30, 2018 03:06 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close