• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • विशाखा सुभेदार ठरली राष्ट्रीय पुरस्काराची मानकरी; राज्यपालांच्या हस्ते झाला सन्मान

विशाखा सुभेदार ठरली राष्ट्रीय पुरस्काराची मानकरी; राज्यपालांच्या हस्ते झाला सन्मान

विशाखासोबतच आणखी 10 कर्तुत्ववान स्त्रियांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 • Share this:
  मुंबई 28 जून: महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasya Jatra) या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री विशाखा सुभेदार (vishakha subhedar) हिचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आहे. तिला स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार (Stree Shakti National Award) देऊन गौरवण्यात आलं आहे. कोरोनामुळं राजभवनात मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा पार पडला. विशाखासोबतच आणखी 10 कर्तुत्ववान स्त्रियांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. विशाखानं सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट करुन ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली. “प्रचंड आनंद झाला. आधी विश्वास बसत नव्हता, पण जेव्हा निमंत्रण पत्रिका हातात आली, तेव्हा खरं वाटलं. या पुरस्काराच्या निमित्तानं राजभवनात जाण्याचा योग आला. लेकाला बरोबर घेऊन गेले होते, नेमकं महेशला (पती) काम होत अन्यथा तो देखील आला असता. आईच्या डोळ्यातला आनंद, दादा वाहिनीच्या डोळ्यामधलं प्रेम, आणि पोराने म्हटलेलं एक वाक्य.. "आई एकदम तुला राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार घेताना पहिल आणि भरून आलं.. नवरा फोनवरून सतत संपर्कात तो हि जाम खुश, सासूबाई,जाऊबाई, आत्याबाई, नणंद बाई, भावंड, सगळ्यांसगळ्यांचे कौतुकाचे फोन मित्र मैत्रिणीचे फोन..शुभेच्छा वर्षाव.. खूप खूप शब्दात न सांगता येणारा न मावणारा आनंद झालाय.. मंडळी हे प्रेम आहे तुम्हा सर्वांच, ज्यामुळे मी माझं काम जबाबदारीने पार पाडण्याचा कायम प्रयत्न करत असते. असंच प्रेम कलाकारावर राहू द्या आणि सूर्यदत्त चे संस्थापक ह्यांचे देखील आभार आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे माझ्या देवाचे आभार” अशी पोस्ट शेअर करुन विशाखानं आपला आनंद व्यक्त केला आहे. तिच्या या उपलब्धिवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. ‘बिग बॉस’मध्ये झळकणार का? नेटकऱ्यांच्या चर्चेवर अखेर अंकिता लोखंडेनं सोडलं मौन
  अभ‍िनेत्री विशाखा सुभेदारसोबतच बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला निशिगंधा वाड, धावपटू कविता राऊत, पार्श्व गायिका पलक मुच्‍छल यांसह 11 गुणवंत महिलांना राजभवन येथे स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले.
  Published by:Mandar Gurav
  First published: