Home /News /entertainment /

Vikrant Massey आज पारंपरिक पद्धतीने बांधणार लग्नगाठ, नवरदेव-नवरीचा हळदी डान्स होतोय VIRAL

Vikrant Massey आज पारंपरिक पद्धतीने बांधणार लग्नगाठ, नवरदेव-नवरीचा हळदी डान्स होतोय VIRAL

अभिनेता विक्रांत मेसीने (Vikrant Massey) नुकतंच 14 फेब्रुवारीला अर्थातच व्हॅलेंटाईन डे दिवशी गर्लफ्रेंड शीतल ठाकूरसोबत (Sheetal Thakur) लग्न केल्याचं समोर आलं होतं. परंतु त्यावेळी दोघांनी नोंदणीकृत विवाह केला होता. त्यांनतर आज दोघेही मुंबईत पारंपरिक पद्धतीने लग्न (Traditional Wedding) करणार आहेत

पुढे वाचा ...
  मुंबई, 18 फेब्रुवारी-  अभिनेता विक्रांत मेसीने   (Vikrant Massey)  नुकतंच 14 फेब्रुवारीला अर्थातच व्हॅलेंटाईन डे दिवशी गर्लफ्रेंड शीतल ठाकूरसोबत   (Sheetal Thakur)  लग्न केल्याचं समोर आलं होतं. परंतु त्यावेळी दोघांनी नोंदणीकृत विवाह केला होता. त्यांनतर आज (18 फेब्रुवारी) दोघेही मुंबईत पारंपरिक पद्धतीने लग्न   (Traditional Wedding)  करणार आहेत. तत्पूर्वी त्यांच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. विक्रांत आणि शीतलच्या हळदीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.ज्यामध्ये विक्रांत मेसी आनंदाने थिरकताना दिसत आहे. विक्रांत मेसी आणि शीतल ठाकूर यांच्या लग्नाआधी दोघांचा हळदी समारंभ पार पडला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये विक्रांत त्याच्या लेडी लव्हसोबत जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. हळदी समारंभात विक्रांत हळदीमध्ये संपूर्ण माखलेला दिसत आहे. शिवाय पांढऱ्या रंगाचा पोशाख परिधान केला आहे. तर शीतल ठाकूर पिवळ्या रंगाच्या लेहेंग्यात अतिशय सुंदर दिसत आहे. दोघांच्या जोडीला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. दोघांचे लग्न अगदी खाजगी पद्धतीने होणार असून त्यात अतिशय जवळच्या लोकांना निमंत्रण देण्यात आलं आहे. विक्रांत मेसी आणि शीतल ठाकूर 2015 पासून एकमेकांना डेट करत आहेत. 2019 मध्ये दोघांनी साखरपुडा केला होता. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी सांगितले होते की, साखरपुड्यानंतर लवकरच लग्न करण्याचा दोघांचा विचार होता. परंतु कोरोनामुळे लग्न पुढे ढकलावे लागले होते.
  विक्रांत आणि शीतलने 'ब्रोकन बट ब्यूटीफुल' या वेबसिरीजमध्ये एकत्र काम केले होते. विक्रांत मेसीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तो प्राची देसाई आणि राधिका आपटे यांच्यासोबत 'फोरेन्सिक्स'मध्ये दिसणार आहे. तो सारा अली खानसोबत 'गॅसलाइट'मध्येही दिसणार आहे.तसेच याआधी तो अनेक मालिकांमध्येसुद्धा झळकला होता. शिवाय अभिनेत्याने 'मिर्झापुर' या वेबसीरीजमुळे प्रचंड प्रसिद्धी मिळवली होती. विक्रांतने सुशांत सिंह राजपूतसोबत 'छिछोरे' चित्रपटातही काम केलं आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Bollywood actor, Entertainment, Tv actor, Wedding

  पुढील बातम्या