• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • ‘आमच्या बाळानं या गोष्टींपासून लांब रहावं’ अनुष्का आणि विराटचा निर्णय ऐकून तुम्हालाही वाटेल कौतुक

‘आमच्या बाळानं या गोष्टींपासून लांब रहावं’ अनुष्का आणि विराटचा निर्णय ऐकून तुम्हालाही वाटेल कौतुक

मात्र त्यानंतर विराट कोहलीनं Heartbroken असे कॅप्शन टाकत एक फोटो शेअर केला होता. हा फोटोनंतर डिलीट करण्यात आला. त्यावेळी विराट-अनुष्काचं ब्रेकअप झाले असल्याच्या चर्चा सुरू झाल्या.

मात्र त्यानंतर विराट कोहलीनं Heartbroken असे कॅप्शन टाकत एक फोटो शेअर केला होता. हा फोटोनंतर डिलीट करण्यात आला. त्यावेळी विराट-अनुष्काचं ब्रेकअप झाले असल्याच्या चर्चा सुरू झाल्या.

विराट कोहली (Virat Kolhi) आणि अनुष्का शर्माने (Anushka Sharma) त्यांच्या बाळाच्या जन्माआधीच त्याच्यासाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.

 • Share this:
  मुंबई, 31 डिसेंबर: आजकालचं जग हे डिजिटल जग आहे. मोठ्या माणसांपासून ते अगदी लहान मुलांपर्यंत सगळ्याचेच फोटो आणि व्हिडीओ आपण सोशल नेटवर्किंग साईट्सवर आपण बघतो आणि जर ती मुलं स्टार किड्स (Star Kids) असतील तर काही विचारायलाच नको. त्याच्या जन्मापासून ते मोठं होतानाच्या सगळ्या बाललिलांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या स्टार किड्सचाही वेगळा फॅन फॉलोईंग असतो. पण विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्माने (Anushka Sharma) बाळाबद्दल वेगळं प्लॅनिंग केलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अनुष्का शर्मा म्हणाली, ‘आमच्या बाळाचा जन्म होईल तेव्हा आम्ही शक्यतो त्याला सोशल मीडियापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करू.  आमच्या बाळाला एखाद्या सेलिब्रिटीच्या नाही तर सामान्य मुलासारखी वागणूक मिळावी असा आमचा प्रयत्न असेल.’ लहानपणापासून मीडिया आणि कॅमेरे बाळाला फेस करावे लागू नयेत असं विराट आणि अनुष्काचं मत आहे.
  प्रेग्नंट अभिनेत्री अनुष्का शर्मा (anushka sharma) नुकतंच बोल्ड फोटोशूट (bold photoshoot) केलं आहे. एका फॅशन मॅगझिनच्या (fashion magazine) कव्हर पेजवर ती झळकली आहे. अनुष्कानं VOGUE INDIA साठी बोल्ड फोटोशूट केलं आहे. या फॅशन आणि लाइफस्टाईल मॅगझिनच्या जानेवारी 2021 च्या एडिशनसाठी हे फोटोशूट आहे.
  भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) जानेवारी 2021 मध्ये आई-वडील होणार आहेत. सोशल मीडियावर ऑगस्टमध्ये या सेलिब्रिटीनं चाहत्यांना गूड न्यूज दिली होती. दरम्यान विराट सध्या पितृत्व रजेवर आहे.
  Published by:Amruta Abhyankar
  First published: