ट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट? २८ तारखेला उलगडणार सिक्रेट

ट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट? २८ तारखेला उलगडणार सिक्रेट

विराट कोहलीनं त्याच्या ऑफिशिअल सोशल मीडिया अकाउंटवर हे पोस्टर टाकलंय. 'ट्रेलर द मूव्ही' २८ सप्टेंबरला रीलिज होणार आणि त्यामध्ये विराट कोहली असेल. १० वर्षांनी पुन्हा एकदा पदार्पण करतोय, असंही विराट लिहितो. काय आहे हे २८चं सिक्रेट?

  • Share this:

मुंबई, २१ सप्टेंबर: विराट कोहली सध्या सुरू असलेल्या एशिया कप स्पर्धेपासून दूर आहे, पण आजच्या बांग्लादेशविरोधातल्या मॅचच्या आधी, खरं तर कालपासून तो विशेष चर्चेत आलाय. ट्रेलर द मूव्ही नावाचं एक पोस्टर त्याने त्याच्या ऑफिशिअल सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केलंय. हे कोहलीच्या पहिल्या वहिल्या सिनेमाचं पोस्टर आहे का? एशिया कपसाठी कोहलीला विश्रांती देण्यात आली, ती त्याच्या या चित्रपटासाठीच का? या पोस्टरवर लिहिल्याप्रमाणे २८ सप्टेंबरला हा सिनेमा रीलिज होणार आहे.

अनदर डेब्यु आफ्टर १० इअर्स... आता १० वर्षानंतर पुन्हा एक पदार्पण हे कोहलीनं म्हटलंय ते खरंच की ही काही दुसरं सांगण्यासाठी केलेलं मार्केटिंग गिमिक आहे?

या सगळ्या चर्चांना कदाचित २८ तारखेलाच पूर्णविराम मिळेल. २८च्या शुक्रवारी अनुष्का शर्माचा सुई-धागा हा सिनेमासुद्धा रीलिज होतोय. याच्याशीतरी या ट्रेलर द मूव्हीचा संबंध नसेल ना?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 21, 2018 05:20 PM IST

ताज्या बातम्या